अजितदादा भडकले, पत्रकारांनाच सुनावले

Ajitdada got angry, told reporters

 

 

 

अजित पवार येत्या निवडणुकीत आमदारही बनणार नाही, उपमुख्यमंत्रिपद तर फार लांबची गोष्ट आहे. जनता त्यांना चांगलाच धडा शिकवणार आहे’,

 

असे वक्तव्य शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यावर अजित पवार यांना विचारले असता ते पत्रकारांवरच भडकले.

 

अमरावतीत छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था या संस्थेचे विभागीय कार्यालय, वसतिगृह, अभ्यासिका (सारथी) या संस्थेच्या बांधकामाच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला.

 

यानिमित्ताने अजित पवार यांनी आवर्जून सहभाग नोंदवला. याचवेळी प्रसारमाध्यमांनी अजित पवार यांना वेगवेगळ्या राजकीय विषयांवर बोलते करण्याचा प्रयत्न केला.

 

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, मला माझ्यापुरतं विचारा, सकाळी उठून कुणीतरी काहीतरी बोलणार आणि तुम्ही मला विचारणार… मला काय घेणे देणे आहे?

 

त्यांना जे काही म्हणायचे आहे तो त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येकाला उत्तर द्यायला आम्ही काही बांधील नाही.

 

लवकरच आचारसंहिता लागेल. नंतर भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रमांना मर्यादा येतात, त्यामुळे केलेल्या कामांची उद्घाटने तसेच प्रस्तावित कामांची भूमिपुजने करत आहोत.

 

येणाऱ्या निवडणुकीत किती लोक उभे राहतात? कोणाला किती जागा मिळतात? त्याबाबत माध्यमांनी थोडशी सहनशीलता दाखवावी.

 

आमचे महायुतीचे जेव्हा काही ठरेन, तेव्हा आम्ही पत्रकार परिषद घेऊ आणि आम्ही एकत्रितपणे तुम्हाला सगळ्यांना जागांबाबत सांगू, असे अजित पवार यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *