अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा निवडणूक जाहीरनामा ;उर्दू शाळांसाठी महत्वाची घोषणा ;पाहा VIDEO

Ajit Pawar's NCP Election Manifesto; Important Announcement for Urdu Schools; SeeVIDEO

 

 

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज जाहीरनाम्याची आज घोषणा करण्यात आली आहे. कृषी, वीज, उद्योग आदी विविध क्षेत्रासाठी त्यांनी घोषणा केल्या आहेत.

 

 

 

तसंच, जातनिहाय जनगणनेचाही प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे. आज, अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला.

 

 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विविध पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. परंतु, महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले तरीही जागावाटप आणि जाहीरनामा प्रसिद्ध झाला नव्हता.

 

 

 

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम असताना राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, त्यांनी यशवंतराव चव्हाण

 

 

 

यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची शिफारस करणार असल्याचं या जाहीनाम्यात म्हटलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या जाहीरनाम्याचे वाचन केले.

 

 

 

 

जाहीरनाम्यात काय घोषणा केल्या?
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार
यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न द्यावा याकरता शिफारस करणार

 

 

 

शेतकऱ्यांना एमएसपी व्यवस्थित असली पाहिजे
आपरंपरिक वीजनिर्मिती करणार. खऱ्या अर्थाने पर्यावरणाचा समतोल साधायचा असेल तर पर्यावरणाचं संकट थोपवायचं असेल तर वीजनिर्मिती युनिट, उद्योगांना प्राधान्य,

 

 

 

कृषी पिक विम्याच्या व्याप्तीत वाढ,
जातनिहाय जनगणनेचा प्रश्नमार्गी लावणार,

 

 

 

उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा,
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषेदत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *