अमेरिकेतील भारतातील अवैध प्रवासी भारतात पाय ठेवताच दोघांना अटक

Two illegal immigrants from India in the US arrested as soon as they set foot in India

 

 

 

अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांची हकालपट्टी सुरु आहे. १५ फेब्रुवारीच्या रात्री अमेरिकन हवाई दलाचं विमान अमृतसरमध्ये पोहोचलं. त्यातून ११६ भारतीय नागरिकांना माघारी पाठवण्यात आलं.

 

सी-१७ विमानातून भारतीयांना अमृतसरमध्ये सोडण्यात आलं. ११६ पैकी दोघा जणांना पंजाब पोलिसांनी लगेचच अटक केली. त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. ते दोघे एका हत्या प्रकरणात फरार होते.

अमृतसर विमानतळावर उतरलेल्या दोघांना अटक करण्यात आल्याच्या वृत्ताला एसएसपी नानक सिंग यांनी दुजोरा दिला. ‘संदीप सिंह उर्फ सनी आणि प्रदीप सिंह अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत.

 

दोघे चुलत भाऊ आहेत. ते पंजाबच्या पटियाला जिल्ह्यातील राजपुऱ्याचे रहिवासी आहेत. संदीप आणि अन्य ४ आरोपींविरोधात २६ जून २०२३ रोजी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला.

 

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०२, ३०७, ३२३, ५०६, १४८ आणि १४९ च्या अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली,’ अशी माहिती सिंग यांनी दिली.

हत्या प्रकरणाच्या तपासात प्रदीपचंही नावं आलं. त्यामुळे एफआयआरमध्ये त्याच्या नावाचाही समावेश करण्यात आला. राजपुरी पोलीस ठाण्याच्या एसएचओंच्या नेतृत्त्वातील एका पथकानं १५ फेब्रुवारीला दोघांना अटक करण्यासाठी पथक रवाना झालं.

 

अमृतसरच्या श्री गुरु रामदास विमानतळावर अमेरिकेच्या हवाई दलाचं विमान उतरताच दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली. आता त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई सुरु करण्यात आली आहे.

अमेरिकेनं पाठवण्यात आलेल्या विमानात ११६ जण होते. त्यातील ६५ जण पंजाबचे आहेत. १५ फेब्रुवारीला रात्री ११.३५ वाजता सी-१७ विमान अमृतसरमध्ये उतरलं.

 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैधपणे राहणाऱ्या नागरिकांविरोधात मोहीम हाती घेतली आहे. अमेरिकेत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या नागरिकांची ट्रम्प यांनी हकालपट्टी सुरु केली आहे.

 

अमेरिकन प्रशासन टप्प्याटप्प्यानं अवैध रहिवाशांना त्यांच्या मायदेशी पाठवत आहे. याआधी ५ फेब्रुवारीला अमेरिकन हवाई दलाचं विमान अमृतसरमध्ये उतरलं. त्यात १०४ भारतीय होते. डंकी रुटनं हे भारतीय अमेरिकेत पोहोचले होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *