आता लाडक्या बहिणींना २१०० रुपये मिळण्यासाठी अटी, शर्थीं ?
Now, what are the terms and conditions for the beloved sisters to get Rs. 2,100?

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आला आहे. निवडणुकीत महायुतीने
लाडकी बहीण योजनेचा लाभ २१०० रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार? असे लाभार्थी महिलांकडून विचारला जात होते.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, महिलांना २१०० रुपये मिळणार हे नक्की आहे. आम्ही जी आश्वासने दिली त्या पूर्ण करणार आहोत.
ही आश्वासने पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्या आम्ही आधी करू. छाणनीबद्दल बोलायचे झाले तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल,
त्यांना लाभ मिळेलच. पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत.
तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती, तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता, असे समोर आले होते.
त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत, असे सांगितले होते. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल.
या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला
रविभवन येथे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत विरोधकांनी लाडकी बहिण योजनेवरून अनेक आरोप केले आहेत.
लाडक्या बहिणींना सरकार २१०० रुपये कधी देणार? असा प्रश्न विरोधकांनी केला. तसेच अटी व शर्थी न लावता सरसकट पैसे द्यावे अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच सरकारने तात्काळ शेतकरी कर्जमाफीची घोषणा करावी अशीही मागणी केली.
हिवाळी अधिवेशानात लाडकी बहीण योजनेतील अनुदान पंधराशे रुपयांवरुन एकवीसशे रुपये करु असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलं होतं.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले जात आहेत.
कोट्यावधी महिलांनी लाडकी बहीण योजनेचे लाभ घेतला आहे. 1500 रुपये या प्रमाणे तीन महिन्यांचे मनाधन तसेच 3 हजार रुपयांचा दिवाळी बोनस देखील लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत.