उद्धव ठाकरे आयुष्यात पहिल्यांदाच करणार हाताच्या पंज्याला मतदान
Uddhav Thackeray will vote with his paw for the first time in his life

बदललेल्या राजकीय परिस्थितीवरुन ठाकरेंना आता काँग्रेसला मतदान करावं लागणार आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून
काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरेंना यांना वर्षा गायकवाडांना मतदान करावं लागणार आहे.
शनिवारी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी वर्षा गायकवाड ह्या मातोश्री निवासस्थानी दाखल झाल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,
मी मुंबई नॉर्थ सेंट्रल लोकसभा मतदारसंघाचा मतदार आहे आणि वर्षा गायकवाड यांना मतदान करणार आहे. इंडिया अलायन्स ही लोकसभा निवडणूक जिंकणार आहे.
वर्षा गायकवाड ह्या माझ्या छोट्या बहीण आहेत. आम्ही त्यांना आमचा खासदार म्हणून दिल्लीला पाठवणार आहोत. हुकूमशाहीचं सरकार हटवण्यासाठी आम्ही एकजुटीने लढणार आहोत, असं ठाकरे म्हणाले.
दरम्यान, वर्षा गायकवाड ह्या मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. मुंबईतल्या साऊथ सेंट्रलच्या जागेसाठी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस समोरासमोर आले होते.
सुरुवातीला वर्षा गायकवाड ह्या साऊथ सेंट्रल जागेवरुन निडणूक लढवणार होत्या. परंतु ठाकरेंनी ही जागा काँग्रेसला सोडण्यास नकार दिला.
मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून मागच्या दोन टर्मपासून भाजपच्या पूनम महाजन खासदार आहेत. सध्या भाजपने या जागेसाठी कुणाचंही नाव जाहीर केलेलं नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपला समर्थन देऊन सरकार स्थापन केल्यानंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक आहे. त्यामुळे या मतदारसंघात काय होईल, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.