घराबाहेर पडणे टाळा,29, 30 आणि 31 मार्चला मोठा धोका,

Avoid stepping out of the house; there is a major risk on March 29, 30, and 31.

 

 

हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात गारपिटीसह पाऊस होताना दिसत आहे. मध्ये दोन दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अवकाळी वाऱ्यासह पावसाचा अत्यंत मोठा इशारा देण्यात आला.

अशोक खरात सरकारचा माणूस, त्याचासोबत 40 आमदार

आज राज्यातील अनेक भागात थेट वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. यासोबतच सतत हवामानात बदल होत असल्याने आंब्याचे पिकही धोक्यात आहे. मार्च महिन्यात पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे अगोदरच रब्बी पिकाचे नुकसान झाले.

 

काही भागात पाऊस तर काही भागात उष्णता अशी स्थिती सध्या आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पारा 40 पार जात आहे. आज राज्यातील तापमानात चढउतार बघायला मिळेल. मुंबईमध्ये आज सकाळी ढगाळ वातावरण बघायला मिळाले.

रेशनवर मिळणार रॉकेल

भारतीय हवामान विभागाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज पावसाचा येलो अलर्ट जारी केला. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाच अंदाज आहे.

 

उद्यापासून राज्यात पावसासाठी अधिक पोषक वातावरण असणार आहे. लातूर, धाराशिव, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.

इराणची हादरवणारी धमकी, जग तणावात

उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपिट होण्याचा अंदाज आहे. वाशिम, धुळे, चंद्रपूर, नागपूर, ब्रह्यपुरी या जिल्ह्यांमध्ये काल 40 अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान नोंदवले गेले.

 

अमरावती येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली. 29, 30 आणि 31 मार्च दरम्यान राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम असेल. अमरावती येथे 41.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. सतत पाऊस आणि गारपिट होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

सोनं अजून किती स्वस्त होणार?

रत्नागिरी गेल्या दोन दिवसांपासून बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम हापूस आंब्यावर झाला. तयार झालेला हापूस आंब्याची गळ वाढली आहे. यावर्षी केवळ रत्नागिरी जिल्ह्यात हापूसचे प्रमाण दहा टक्के आहे.

 

सकाळी थंडी आणि दुपारनंतर तापमान वाढ यामुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव होत आहे. आंबा भाजून काळा पडून तयार झालेला आंबा गळून पडतोय. ज्या हंगामात आंब्याची तोडणी करायची त्या हंगामात आंब्यावर फवारणी करावी लागत आहे. आंब्याचं मोठं नुकसान, आंब्यावर तुडतुडा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

रेशनवर मिळणार रॉकेल

Related Articles