नांदेडमध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगारांचा थरार ,,, बेछूट गोळीबार, एकाचा मृत्यू

Thrilling moment for criminals released on parole in Nanded, indiscriminate firing, one dead

 

 

 

खुनाच्या प्रकरणात पॅरोलवर सुटलेल्या आरोपी आणि त्याच्या साथीदारावर गोळीबार करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी नांदेडच्या शहीदपुरा भागात घडली. हल्लेखोरांनी पाळत ठेवून हल्ला केल्याची माहिती आहे.

 

यावेळी एकाच्या छातीत तर अन्य एकाच्या पाठीत गोळ्या लागल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले होते. जखमींवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांनी प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती होती.

 

यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रविंद्रसिंघ राठोड असं मृत्यू झालेल्या आरोपीचं नाव आहे तर गुरमितसिंघ सेवादार हा जखमी आहे.

 

दरम्यान, याप्रकरणाचं कुख्यात दहशतवादी रिंदा कनेक्शन असल्याची चर्चा आहे. पोलिसांकडून मात्र याला कुठलाही दुजोरा देण्यात आलेला नाही. गोळीबाराच्या घटनेने नांदेड शहर हदरलं आहे.

 

गुरमितसिंघ सेवादार हा एका खुनातील आरोपी आहे. काही वर्षांपूर्वी कुख्यात दहशतवादी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा याच्या भावाचा बाफना परिसरात खून करण्यात आला होता. त्यातील गुरमीतसिंघ सेवादार हा आरोपी असल्याची माहिती आहे. दरम्यान, बारा दिवसांपूर्वी तो पॅरोलवर सुटला होता.

 

सोमवारी (१० फेब्रुवारी) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास गुरमीतसिंघ सेवादार आणि त्याचा साथीदार रविंद्रसिंघ राठोड हे दोघे शहीदपुरा भागात जात होते. तेवढ्यात हल्लेखोर तेथे पोहचले आणि

 

त्यांच्यावर गोळीबार करायला सुरुवात केली. हल्लेखोरांनी तीन ते चार गोळ्या झाडल्या, त्यापैकी सेवादार याच्या छातीत दोन गोळ्या लागल्या तर एक गोळी राठोड यांच्या पाठीत लागल्याची माहिती आहे. गोळीबारा दरम्यान एक गोळी एका नागरिकाच्या वाहणावरही लागली.

 

रक्तबंबाळ झालेल्या जखमींना तात्काळ नांदेडच्या विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, उपाचारादरम्यान रविंद्रसिंघ राठोडचा मृत्यू झाला.

 

दरम्यान, गोळीबाराची घटना घडल्याची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव, डीवायएसपी सुशील नायक यांच्या सह पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेस तापसण्यात आले.

 

गोळीबार करण्यामागचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, गोळीबारच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, हल्लेखोरांचा उद्देश काय होता. हल्लेखोर कोण होते याचा तपास सूरू असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार यांनी दिली.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *