भाजपात मंत्रिपदांसाठी जोरदार लॉबिंग

Intense lobbying for ministerial posts in BJP

 

 

 

राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर एकनाथ शिंदे, अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.

 

त्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार याची उत्सुकता आहे. भाजपचे १३२ आमदार असल्यानं मंत्रिमंडळात त्यांच्या आमदारांची संख्या सर्वाधिक असेल.

 

शिंदे सरकारमध्ये भाजपचे केवळ १० मंत्री होते. तर पक्षाच्या आमदारांची संख्या १०५ इतकी होती. त्यामुळे अनेकांना मंत्रिपदाची लॉटरी लागलीच नाही. ही सगळी आमदार मंडळी आता मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. त्यांची यादी तशी बरीच मोठी आहे.

 

मंत्रिपदांसाठी इच्छुकांची भलीमोठी यादी आहे. तितकीच उत्सुकता विधानसभा अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष पदावर कोणाची वर्णी लागणार याबद्दल आहे.

 

पक्षाची सत्ता आल्यावर सगळ्यांना सरकारमध्ये जाण्यात रस असतो. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष होण्याची, विधानसभा अध्यक्षपदी बसण्याची कोणाचीही इच्छा नसते.

 

आता भाजपनं जवळपास बहुमताचा आकडा गाठण्याइतकं यश मिळवलेलं असताना प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष कोण होणार, याची उत्सुकता आहे.

 

पक्षाची सत्ता आल्यावर सगळ्यांना मंत्री होण्याची इच्छा असते. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपद, विधानसभा अध्यक्ष होण्यास कोणीही तयार होत नाही. विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

 

याच बावनकुळेंचं तिकीट गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी पक्षानं कापलं होतं. त्यानंतर पक्षानं त्यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं. याच बावनकुळेंच्या नेतृत्त्वात भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलं.

 

फडणवीस २०१४ ते २०१९ या कालावधीत मुख्यमंत्री असताना बावनकुळेंकडे ऊर्जामंत्रिपद होतं. त्यामुळे त्यांच्याकडे मंत्रिपदाचा अनुभव आहे.

 

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होईपर्यंत बावनकुळेच प्रदेशाध्यक्षपदी राहतील, अशी शक्यता आहे. त्यानंतर ते मंत्रिमंडळात सहभागी होतील.

 

त्यांच्या जागी विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे किंवा आमदार आशिष शेलार यांची वर्णी लागू शकते. फडणवीस सरकारमध्ये त्यांनी शिक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळली आहे. पण त्यांना केवळ ५ महिन्यांसाठीच मंत्रिपद मिळालं होतं.

 

विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे त्यांचा ओम बिर्ला होण्याची शक्यता आहे. संसदेत ओम बिर्ला जून २०१९ पासून लोकसभेचं अध्यक्षपद सांभाळत आहेत.

 

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी बिर्ला यांनाच संधी दिली. आता त्याच प्रकारे नार्वेकर यांना पुन्हा एकदा अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *