महाराष्ट्र हादरणार? पुढील राजकीय भूकंपांची चाहूल? ‘2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला…’

Will Maharashtra shake? A sign of the next political earthquake? 'You have to wait 2 to 3 days...'

 

 

 

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी केलेल्या पोस्टवरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्क लावले जात असतानाच स्वत: राऊत यांनी यावरुन भाष्य केलं आहे.

 

पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं देताना राऊत यांना त्यांच्या या सूचक पोस्टबद्दल विचारण्यात आलं असता त्यांनी, ‘2 ते 3 दिवस थांबा तुम्हाला ट्वीटचा अर्थ कळेल,’ असं म्हटलं आहे.

 

त्यामुळे राऊतांनी पोस्ट केलेला हा फोटो खरोखरच महाराष्ट्रातील एखाद्या राजकीय भूकंपाची चाहूल तर नाही ना अशी चर्चाही दबक्या आवाजात होऊ लागली आहे.

 

काय आहे राऊतांच्या पोस्टमध्ये?
संजय राऊतांनी शुक्रवारी सायंकाळी केलेल्या पोस्टमध्ये एक बकरा लाकडावर उभा असल्याचं दिसत आहे. राऊत यांनी या पोस्टमध्ये बकऱ्याचा फोटो अटॅच करुन, “खबर पता चली क्या?” अशी चार शब्दांची कॅप्शन दिली आहे.

 

तसेच त्यांनी या पोस्टच्या खाली, “ए. सं. शी. गट…” असं लिहिलेलं आहे. संजय राऊत हे सामान्यपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या शिवसेनेचा शिंदेंच्या नावाच्या अद्याक्षरांवरुन ‘ए. सं. शी. गट’ असा उल्लेख करतात.

 

 

त्यावरुनच त्यांनी पोस्ट केलेला हा फोटो एकनाथ शिंदेंना डिवचण्यासंदर्भात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राऊत यांच्या या पोस्टवरुन तर्क-वितर्क लढवले जात असतानाच त्यांनी ही पोस्ट केल्यानंतर जवळपास 12 तासांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पोस्टबद्दल सूचक विधान केलं आहे.

 

 

त्या पोस्टचा अर्थ काय? राऊत म्हणाले, “आता बास झालं…”
तुम्ही ट्विटरवर केलेल्या पोस्टचा अर्थ काय? असं राऊत यांनी विचारलं असता त्यांनी, “महाराष्ट्रातला एक बकरा आहे आणि तो बकरा खाटकाच्या लाकडावर उभा आहे.

 

त्या बकऱ्याला उभा केलेला आहे आणि सांगितलेलं आहे की, फार शहाणपणा केला तर मारू. गप्प उभं राहायचं आणि बे बे करत जायचं. आता बास झालं तुमचं खूप ऐकलं, असं दिल्लीत या बकऱ्याच्या कानात कोणीतरी सांगितलं आहे,” असं उत्तर दिलं.

 

‘ए. सं. शी. गट’वरुन विचारला असता म्हणाले…
पुढे पत्रकाराने तुम्ही या पोस्टखाली ‘ए. सं. शी. गट’ असा उल्लेख केला आहे. त्यावरुन राऊतांनी पत्रकाराला, “तुम्हाला यु. बी. टी. माहित आहे तर एस एन शीं गट माहित असायला हवा, अभ्यास करा थोडा” असा खोचक सल्ला दिला.

 

आता राऊतांनी केलेल्या दाव्यानुसार पुढील काही दिवसांमध्ये खरोखरच काही घडतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या तरी राऊतांनी दिलेल्या इशाऱ्यावरुन बकऱ्याचा हा फोटो महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंपही आणू शकतो अशी जोरदार चर्चा आहे.

 

पण नेमकं होणार काय याची नेमकी कल्पना ना राऊतांनी दिली आहे ना यावर कोणी प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसातील राजकीय घडामोडींचा संदर्भ राऊतांच्या या ट्वीटशी जोडला जाऊ शकतो असंही बोललं जात आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *