लाडकी बहीण योजना महिलेच्या खात्यावर जमा झाले फक्त 500 रुपये
Ladki Bhaeen Yojana: Only Rs 500 deposited in woman's account

सत्तेत आलो तर लाडकी बहीण योजनेचे पैसे १५०० वरून २१०० रुपये केले जातील, असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं होतं. सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यात अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवले जातील, असं बोललं जातं होतं. मात्र अद्याप अशाप्रकारची सरकारने कसलीही घोषणा केली नाही.
अशी एकूण परिस्थिती असताना आता एका महिलेच्या अकाऊंटवर १५०० ऐवजी केवळ ५०० रुपये आले आहेत. लाडकी बहीण योजनेचे पैसे पाठविणाऱ्या विभागाकडून अजब कारभार केल्याचं समोर आलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील येवला येथील एका लाभार्थी महिलेच्या खात्यावर 8 मार्चला फेब्रुवारी महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे पैसे प्राप्त झाले.
मात्र संबंधित महिलेला 1500 रुपये ऐवजी केवळ 500 रुपये मिळाले. त्यामुळे लाभार्थी महिलेचे एक हजार रुपये कुठे गेले, असा प्रश्न पडला या महिलेला पडला आहे.
राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाभधारक महिलांच्या खात्यांमध्ये फेब्रुवारी महिन्याचे पैसे जमा होत आहे.
मात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असलेल्या येवल्यातील पारेगावच्या रहिवासी वैशाली सुरासे यांच्या खात्यावर १५०० रुपये ऐवजी अवघे ५०० रुपये आले आहेत. त्यामुळे माझे हजार रुपये गेले तरी कुठे असा प्रश्न सुरासे यांना पडला आहे.