शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 44 उमेदवारांची नावे जाहीर;पाहा कुणाकुणाला संधी

Names of 44 candidates of Sharad Pawar's NCP announced; see who has a chance

 

 

 

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी

 

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान ही पहिली यादी असून दुसरी यादी पुढील दोन दिवसांमध्ये दुसरी जाहीर करणार असल्याचे म्हणाले.

 

इस्लामपूरमधून जयंत पाटील रिंगणात असतीलय काटोल मतदारसंघातून अनिल देशमुख रिंगणात असणार आहेत. घनसावंगीमधून राजेश टोपे रिंगणात असतील.

 

कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुंब्रा कळवा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

 

जयंत पाटील यांनी पहिल्या यादीत शरद पवार गटाच्या एकूण 44 उमेदवारांची नावे जाहीर केली. यामध्ये बारामती मतदारसंघाचा देखील समावेश आहे.

 

बारामतीमधून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरुद्ध पुतणे युगेंद्र पवार यांच्यात आता थेट लढत बघायला मिळणार आहे.

 

याआधी लोकसभेतही राष्ट्रवादीच्या पवार कुटुंबातीलच नणंद-भावजयी यांच्यात लढत बघायला मिळाली होती. आता बारामती विधानसभेत काका-पुतण्यात राजकीय लढाई होणार आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यासाठी ही लढाई कठीण असणार आहे.

 

वाचा उमेदवारांची यादी
इस्लामपूर – जयंत पाटील
काटोल – अनिल देशमुख

घनसावंगी – राजेश टोपे
कराड उत्तर – बाळासाहेब पाटील

मुंब्रा-कळवा – जितेंद्र आव्हाड
कोरेगाव – शशिकांत शिंदे

 

बसमत – जयप्रकाश दांडेगावकर
जळगाव ग्रामीण – गुलाबराव देवकर

इंदापूर – हर्षवर्धन पाटील
राहुरी – प्राजक्त तनपुरे

 

शिरुर – अशोक पवार
शिराळा – मासिंगराव नाईक

विक्रमगड – सुनील भुसारा
कर्जत – जामखेड – रोहित पवार

अहमदपूर – विनायकराव पाटील
सिंदखेडराजा – राजेंद्र शिंगणे

उदगीर – सुधाकर भालेराव
भोकरदन – चंद्रकांत दानवे

तुमसर – चरण वाघमारे
किनवट – प्रदीप नाईक
जिंतूर –  विजय भाबळे

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *