संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक

Sanjay Raut and Nana Patole had a heated verbal exchange

 

 

 

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडण्याची चिन्हं आहेत. कारण सांगलीच्या जागेवरुन

 

 

 

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वायुद्ध रंगल्याचं बघायला मिळत आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार,

 

 

 

 

सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. पण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील तिथे अधिकृत उमेदवार आहेत.

 

 

 

त्यामुळे सांगलीच्या जागेवरुन मविआत आता घमासान होण्याची शक्यता आहे. “सांगलीच्या जागेबाबत मी नंतर बोलेन. मी त्याबाबत बोलणारच आहे.

 

 

 

आम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आमचं आयुष्य राजकारणात गेलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. तर दुसरीकडे “राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने तयार केली”,

 

 

 

 

असा पलटवार नाना पटोले यांनी दिला. “राऊत विद्वान आहेत. ते कालच लंडनमधून परत आले”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.

 

 

 

 

विदर्भात काय निकाल लागतात? पश्चिम महाराष्ट्रात काय निकाल लागतात? कोणता अपक्ष जिंकतोय? का जिंकतोय? हे आम्हाला माहिती आहे. मी त्यावर नंतर बोलेन. मी प्रत्येक गोष्ट बोलणारच आहे.

 

 

 

आम्ही सुद्धा इथे गोट्या खेळायला बसलेलो नाहीत. आमचं सुद्धा संपूर्ण आयुष्य राजकारण, समाजकारण आणि पत्रकारितेत गेलं आहे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे, असं संजय राऊत म्हणाले.

 

 

 

संजय राऊत यांच्या वक्तव्यावर नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं. “संजय राऊत यांच्या वक्तव्यावर मी जास्त बोलणार नाही. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केलेली होती.

 

 

 

त्याच्या गावात पिण्याचं पाणी, दवाखाना, त्याचं बाळंतपण ज्या दवाखान्यात झालं ते काँग्रेसने निर्माण केलं होतं. बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान टिकवण्याचं कामही काँग्रेसने केलं आहे.

 

 

 

 

त्यामुळे मी त्यांच्यावर का प्रतिक्रिया द्यावी? संजय राऊत अतिविद्वान आहेत. याशिवाय ते कालच लंडनहून आलेले आहेत. त्यामुळे तिथून जास्त काय शिकून आले ते माहिती नाही”, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

 

 

 

एक्झिट पोलच्या आकडेवाडीनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी होताना दिसत आहे. कारण महायुतीला फक्त 22 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.

 

 

 

तर महाविकास आघाडीला 25 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत निवडणुकीच्या सुरुवातीपासून महाविकास आघाडीत वाद होता.

 

 

 

 

ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात सुरुवातीपासून या मतदारसंघावर दावा केला जात होता. सांगलीचे स्थानिक काँग्रेस नेत्यांनी ही जागा आपल्या पक्षाला मिळावी यासाठी

 

 

 

दिल्लीतील पक्षाच्या हायकमांडकडे विनंतीदेखील केली होती. पण कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात सांगलीची जागा ठाकरे गटाला देण्यात आल्याचं पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आलं होतं.

 

 

 

 

असं सगळं असताना काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी लढवली. विशेष म्हणजे त्यांच्यावर काँग्रेसकडून कोणतीही कारवाई झाली नाही.

 

 

 

 

यावरुन ठाकरे गटाने याआधीदेखील काँग्रेसवर निशाणा साधलाय. पण आता संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक बघायला मिळत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *