सोसाट्याच्या वार्यासह अवकाळी पाऊस ,गारपीट
Unseasonal rain with gusty winds, hail

बुलडाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुके व घाटावरील तालुके अशा चोहीकडे काल जोरदार अवकाळी पावसाने गारपीटीसह बळीराजाला दणके दिले.
शेगावसह तालुक्यातील काही भागात तर वीज, सोसाट्याच्या वार्यासह पाऊस पडला. अंगावर वीज पडून शेगाव तालुक्यातील टाकळी येथील तरूणाचा जागीच मृत्यू झाला.
चिखली, मेहकर, खामगाव, लोणार, बुलढाणा, देऊळगावराजा, शेगाव या तालुक्यांमध्ये या अवकाळी पावसाने दाणादाण उडवली होती.
या पावसाने काढणीला आलेला गहू, हरभरा तसेच कांदासह आंब्यांचा मोहोर, फळबागा व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
मागील वर्षाच्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई अद्यापही शेतकर्यांना मिळालेली नाही. एक रुपयाचा पीक विमा हेही सरकारने शेतकर्यांना दिलेला लॉलीपॉप ठरले असताना
हे नवे संकट शेतकर्यांवर कोसळ्याने शेतकरी पुरता हादरून गेलेला आहे. हवामान विभागाने जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती.
त्यानुसार बुलढाणा जिल्ह्यात काल १५ फेब्रुवारीला सायंकाळी अवकाळीचा जोरदार तडाखा बसला. या अवकाळी पावसाने रब्बी पिकावर मोठा परिणाम झाला असून,
गहू, हरबरा, तूर, कांदा पिकाचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकरी अक्षरशः रडकुंडीला आलेला आहे.