१ एप्रिलपासून RBI कडून ऑनलाइन पेमेंटच्या नियमांत बदल

Changes to Online Payment Rules by the RBI from April 1st

 

 

डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून सर्व ऑनलाइन व्यवहारांसाठी अधिक कडक ऑथेंटिकेशन नियम लागू होणार आहेत. वाढत्या सायबर फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आला आहे.

 

आता पेट्रोल-डिझेल साठी ॲपवर बुकिंग आवश्यक
नवीन नियमांनुसार प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी दोन स्तरांचे (Two-Factor) ऑथेंटिकेशन बंधनकारक असेल. यामध्ये किमान एक घटक डायनॅमिक असणे आवश्यक आहे, जसे OTP, बायोमेट्रिक पडताळणी किंवा डिव्हाइस-आधारित प्रमाणीकरण.

 

सध्याची OTP-आधारित प्रणाली फिशिंग आणि सिम-स्वॅपसारख्या फसवणुकीसाठी असुरक्षित ठरत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे अधिक सुरक्षित पद्धतींची गरज निर्माण झाली आहे.

 

आता पेट्रोल-डिझेल साठी ॲपवर बुकिंग आवश्यक
RBIने कोणतेही एक विशिष्ट तंत्रज्ञान बंधनकारक केलेले नाही. बँक आणि फिनटेक कंपन्यांना बायोमेट्रिक्स, टोकनायझेशन, डिव्हाइस-बेस्ड बँकिंग आणि रिस्क-बेस्ड ऑथेंटिकेशन वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.

 

डिजिटल व्यवहारांची संख्या झपाट्याने वाढत असताना फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तज्ज्ञांच्या मते, मल्टीलायर ऑथेंटिकेशनमुळे फसवणुकीचा धोका कमी होईल आणि ग्राहकांचा विश्वास वाढेल.

नागपुरात खासदाराच्या कारला ट्रकची जोरदार धडक, रुग्णालयात दाखल

नवीन नियमांनुसार, सुरक्षा नियमांचे पालन न केल्यास बँक आणि पेमेंट सेवा पुरवठादारांवर जबाबदारी वाढणार आहे. लघु व मध्यम उद्योगांसाठी (SMEs) हा बदल फायदेशीर ठरणार असून फसवणूक आणि आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होईल. अधिक सुरक्षा उपायांमुळे व्यवहारांमध्ये थोडा विलंब होऊ शकतो.

 

मात्र, रिस्क-बेस्ड ऑथेंटिकेशनमुळे कमी जोखमीचे व्यवहार जलद पूर्ण होतील, तर जास्त जोखमीच्या व्यवहारांसाठी अतिरिक्त तपासणी केली जाईल. यामुळे सुरक्षितता आणि सोयी यामध्ये संतुलन राखले जाईल.

शालार्थ आयडी घोटाळ्यात भोंदूबाबा अशोक खरातचा हात?

Related Articles