अजितदादांचा बारामतीत गेम होणार? पोस्टल मतमोजणीत पिछाडीवर

Will Ajitdada's game be in Baramati? Lagging behind in postal vote counting

 

 

 

राज्यातील पोस्टल मतमोजणीत धक्कादायक कल समोर येत आहे. हायप्रोफाईल लढतीत दिग्गजांना मोठा धक्का बसण्याची शक्यता दिसत आहे.

 

सकाळी सकाळीच या दिग्गजांची चिंता वाढली आहे. सर्वांचे लक्ष लागलेल्या बारामती मतदारसंघात मोठा उलटफेर दिसण्याची शक्यता समोर येत आहे.

 

अजित पवार यांच्यावर पुतण्या युगेंद्र पवार याचा वरचष्मा दिसत आहे. सुरूवातीच्या मतमोजणीत युगेंद्र पवार याने आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

 

राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. अर्थात हा सुरुवातीचा कल आहे. येत्या काही तासात सर्व चित्र स्पष्ट होईल.

 

बारामतीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेत सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला. अजित पवार यांच्याविरोधात युगेंद्र पवार असा सामना आहेत. खरा सामना हा अजित पवार विरुद्ध शरद पवार असाच होता.

 

आता आलेल्या पोस्टल मतदानात युगेंद्र पवार यांनी आघाडी घेतली आहे. त्यामुळे बारामतीत खेला होबे होईल का, अशी चर्चा रंगली आहे. अजित पवार यांच्या राजकीय अस्तित्वाची ही मोठी लढाई ठरत आहे.

 

तर बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातही शरद पवार गटाचे अनेक जण आघाडीवर असल्याने अजित पवार गटाची चिंता वाढली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *