अजित पवार आणि शिंदे गटात नाराजीनाट्य ;महायुतीत पडद्यामागे हालचालींना वेग
Dissatisfaction between Ajit Pawar and Shinde factions; Behind-the-scenes movements in the Mahayuti accelerate


राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी (24 जून) मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मात्र या कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळालं आहे.
इस्रायल-इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात काय काय महागणार ?
एकनाथ शिंदेंची शिवसेना मंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर मंत्री उदय सामंतांकडून अजित पवारांची भेट घेण्यात आली. तर त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचे बघायला मिळाले आहे.
आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा, याकरता उदय सामंतांनी पुढाकार घेत बैठकीत आपल्या पक्षाची बाजू मांडली असल्याचे बोललं जात आहे.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजा-वादळांसह पावसाचा अंदाज
तर निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी
उदय सामंतावर टाकण्यात आली असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिष्टाईची महायुतीतील समन्वय राखन्यास कशी मदत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राज्यात आणखीन एक IAS अधिकारी गोत्यात
दरम्यान, निधीवाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेकडून तातडीची पावले उचलली जात आहेत.
राहुल गांधींकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात घोटाळ्याचा आरोप
त्यामुळेच निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंत यांना देण्यात आली आहे.
सोबतच आगामी निवडणूकीत मतदारांसमोर जातांना पुरेसा निधी आणि विकासकामे गरजेची आहेत. याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई ;शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये खळबळ
निधी वाटप करतांना कोणत्या कामासाठी किती निधी दिला जावा, यात शिवसेनेत पक्षीय पातळीवरही समन्वय राखला जावा,
निधीवाटपात सूसुत्रता यावी याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करतांना दिसत आहेत.
अमेरिकेत एअर स्ट्राईकची सीक्रेट रिपोर्ट लीक; ट्रम्प तोंडावर पडले
शिवाय उदय सामंत यांचे शिवसेनेत मंत्री म्हणून वजन आहेच. सोबतच राष्ट्रवादीतही जून्या सहकाऱ्यांसोबत ते चांगले संबंध ठेवून आहेत. त्यामुळे उदय सामंत हे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरही समन्वयकाचीच भूमीका पार पाडत आहेत.
सहा वर्षांच्या मुलीला गळफास देऊन पोलिस शिपायाने स्वतः केली आत्महत्या
असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उदय सामंत यांच्याकरवी निधीवाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना आहे.
अर्थमंत्री अजित पवार हे निधी वाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक देत असल्याची तक्रार शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
शिवसेना मंत्र्यांचा संताप पाहता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीतच अर्थमंत्री अजित पवार यांच्या खात्यावर बारीक लक्ष ठेवण्याचे शिवसेना मंत्र्यांना आदेश दिले.
अर्थमंत्री अजित पवार यांच्या विभागात १४००/१४०० कोटी रुपयांचे दोन निधी आहेत. या निधी वाटपावर आणि त्यांच्या वितरणावर विशेष लक्ष ठेवण्यास एकनाथ शिंदे यांनी आमदार-मंत्र्यांना सांगितले असल्याची माहिती सूत्रांची दिली.
राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांचा हक्काचा निधी दिला जात नाही, अशी तक्रार शिवसेना मंत्र्यांनी केली. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट घेतली. उभय नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत शिवसेना मंत्र्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजित पवार यांनी केला.
याआधीही संजय शिरसाट यांनी अतिशय आक्रमकपणे अजित पवार यांच्याविरोधात पवित्रा घेतला होता. सामाजिक न्याय विभागाचा निधी अजित पवार यांनी वळवून आमच्या विभागावर अन्याय केल्याचे पत्रकार परिषद घेऊन शिरसाट म्हणाले. शिरसाट यांच्या तक्रारीनंतर अजित पवार यांना अनेकदा स्पष्टीकरण द्यावे लागले.