अशोक चव्हाणांसमोर घोषणा ……. गुन्हा दाखल

Declaration before Ashok Chavan ....... Case registered

 

 

 

 

 

नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांच्या ताफ्यासमोर घोषणा देणाऱ्या तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यानंतर आता मराठा आरक्षणाच्या घोषणा देणं पाप आहे का?

 

 

 

अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी सवाल उपस्थित केला आहे. तुम्ही गोरगरिबांच्या पोरांवर केसेस दाखल करायला लागले आहात, असं जरांगे म्हणाले आहेत.

 

 

 

गाडीच्या खाली उतरून तुम्हाला मारहाण केली का? मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या म्हणजे पाप आहे का? इतका सुड देवेंद्र फडणवीस अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून उगवायला लागले आहेत.

 

 

 

 

हे मराठ्यांच्या विरोधातलं षडयंत्र आहे, हे देवेंद्र फडणवीस यांनी रचलं आहे, असं देखील जरांगे म्हणाले. सगळा महाराष्ट्र त्यांच्यासोबत आहे. त्यांनी काळजी करायची गरज नाही. हा देवेंद्र फडणवीस यांचा भरत आलेला खेळ आहे,असं देखील ते म्हणाले.

 

 

 

 

मनोज जरांगे म्हणाले की, माझा कोणालाही पाठिंबा नाही. मराठा समाजाने राज्यात एकही उमेदवार दिला नाही. त्यामुळे कोणी फोटो वापरू नका आणि नावही वापरू नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

 

 

 

 

तुम्ही एकाने वापरला तर बाकीचे पक्ष सुद्धा वापरतील. तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही विनाकारण मराठा आंदोलनाचा आणि आरक्षणाचा

 

 

 

 

राजकीय फायदा कोणीच घेऊ नका. जो जाणून-बुजून नाव घेतो किंवा फोटो वापरतोय त्यांना मराठा समाजाने मदत करू नका, असं देखील ते म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *