अशोक चव्हाण आणि मनोज जरांगेंमध्ये मध्यरात्री काय झाली चर्चा ?

What was the midnight discussion between Ashok Chavan and Manoj Jarang?

 

 

 

 

 

लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी ( 16 मार्च ) होताच राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. खासदार अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची

 

 

 

 

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जाऊन भेट घेतली आहे. सुमारे दीड तास दोघांमध्ये चर्चा झाली. ही भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.

 

 

 

 

 

शनिवारी रात्री अशोक चव्हाण यांनी पोलिस आणि आपल्या गाड्यांचा ताफा 15 किलोमीटर दूर थांबवला. त्यानंतर, एका साध्या कारमधून चव्हाणांनी जात जरांगे-पाटील यांची भेट घेतली.

 

 

 

 

“आमची फसवणूक झाली हे, चव्हाणांना ठासून सांगितलं आहे,” असं जरांगे-पाटलांनी भेटीनंतर म्हटलं. ते एका प्रसारमाध्यमाशी संवाद साधत होते.

 

 

 

जरांगे-पाटील म्हणाले, “अशोक चव्हाण समाज म्हणून भेटायला आले होते. बंद दाराआड मी चर्चा करत नाही. सगेसोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही.

 

 

 

 

 

गुन्हे मागे घेण्यात आले नसून, आता अधिक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. हैदराबाद गॅझेटबद्दल कोणताही निर्णय न झाल्याचं, चव्हाणांना सांगितलं.

 

 

 

 

यासाठी चव्हाण प्रयत्न करतील, नाही करतील मात्र समाज म्हणून निर्णय घेत असल्यानं त्यांना दोष देणार नाही. पण, आमची फसवणूक झाल्याचं चव्हाणांना ठासून सांगितलं.”

 

 

 

“24 मार्चला महाराष्ट्रातील मराठा समाजाची बैठक अंतरवालीत घेतली जाणार आहे. आता सुट्टी नाही, हे चव्हाणांना सुद्धा म्हटलं आहे. भाजप, शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं आम्हाला काही देणंघेणं नाही.

 

 

 

 

सगळ्यांना किमान 38 ते 39 जागांवर फटका बसणार आहे. सगळे आमच्या मुलांचं वाटोळ करत आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी

 

 

 

 

खोटे गुन्हे दाखल करणार नसल्याचं सांगितलं होतं. पण, खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे,” असा आरोप जरांगे-पाटलांनी केला आहे.

 

 

 

“अंतरवालीतील लोकांवर दबाव टाकण्यात आला. पण, अंतरवाली हे महाराष्ट्रातील मराठा लोकांसाठी लढत आहे. येथील लोकांच्या नादाला फडणवीसांनी लागू नये. फडणवीस यांची मग्रुरी जात नाही,” अशी टीकाही जरांगे-पाटलांनी केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *