आघाडीत काँग्रेस , ठाकरे गटात धुसफूस, थेट ‘मातोश्री’वर तक्रार

Congress in the front, confusion in the Thackeray group, direct complaint on 'Matoshree'

 

 

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी आहे.

 

तर अनेक ठिकाणी पक्षांमधील अंतर्गत धुसपूस बाहेर येऊ लागली आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूरमधील हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला अपयश आलं होतं.

 

अशातच आता महाविकास आघाडीमधील अंतर्गत धुसपूस बाहेर येण्यास सुरवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून मदत न झाल्याची तक्रार शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर केली आहे.

 

जिल्ह्यातील राजकारण पाहता कॉंग्रेसकडून ठाकरे गटाला मदत होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाहूवाडी विधानसभा

 

मतदारसंघात कॉंग्रेस ठाकरे गटाला मदत करेल असा शब्द कॉंग्रेसच्या नेत्यांकडून घ्या. अशी मागणी पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.

 

ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी लोकसभा निवडणूक देखील लढवली होती.

 

 

परंतु त्यात त्यांचा पराभव झाला याला जबाबदार शाहूवाडी विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे पदाधिकारी आहेत असा आरोप ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

 

 

अमरसिंह पाटील आणि कॉंग्रेसचे नेते करणसिंह गायकवाड हे गोकुळ दूध संघाचे संचालक आहेत. करणसिंह गायकवाड हे शाहूवाडी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करत आहेत.

 

परंतु जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय राव कोरे यांच्या मदतीने गायकवाड आणि पाटील यांना संचालकपद मिळाले आहे.

 

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोरे यांनी धैर्यशील माने यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे गायकवाड आणि पाटील यांनी देखील धैर्यशील माने यांना पाठिंबा दिल्याचा आरोप आहे.

 

दरम्यान,काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांनी समरजितसिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेऊन

 

भाजपला मोठा धक्का दिला आहे . तर दुसरीकडे अजित पवार गटाचे नेते मंत्री आणि कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे टेन्शन वाढवले आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *