आहेरवाडी येथील २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने मृत्यू
A 28-year-old farmer from Aherwadi died of snakebite

शेतात काम करीत असतांना २८ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे.
त्यामुळे आहेरवाडी गावावर शोककळा पसरली आहे.सचिन दासराव मोरे {वय वर्ष 28 राहणार आहेरवाडी }तालुका पूर्णा जिल्हा परभणी असं त्या मृत तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की सचिन मोरे हा नेहमीप्रमाणेच शनिवारी सकाळी १०च्या सुमारास स्वतःच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेला होता. शेतात काम करत असताना
शेतामध्ये त्याच्या जवळ अचानक आलेल्या सर्पाने त्याच्या उजव्या पायाला जोरदार चावा घेतला. साप चावल्याचे लक्षात येताच त्याने मदतीसाठी आवाज दिला असता आजूबाजूचे शेतकरी त्याच्या मदतीला धावून आले ,
त्यांनी तातडीने सचिनला पूर्णा येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले परंतु शेतातून दवाखान्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच सर्व शरीरातील सर्पाचे विष पसरल्याने त्याचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पक्षात पत्नी ,आई ,तीन बहिणी एक लहान मुलगी असा मोठा परिवार आहे. मनमिळावू
स्वभावाच्या सचिनच्या अचानक जाण्याची घटना मनाला सुन्न करणारी आहे,त्याच्या अकाली निधनाने गावावर शोककळा पसरली.









