काँग्रेस लढवणार लोकसभेच्या 290 जागा ;पहा कोणत्या राज्यात किती जागा लढवणार?

Congress will contest 290 Lok Sabha seats; see how many seats will be contested in which state?

 

 

 

 

चार जानेवारी रोजी काँग्रेस हायकमांडने एक बैठक बोलवली असून सर्व राज्याच्या प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहाणार आहेत. तसेच या बैठकीत जागा निश्चित केल्या जातील.

 

 

काँग्रेसच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाकडून जागा वाटपाच्या बाबतीत नॅशनल अलायंस कमेटी स्थापन करण्यात आली आहे.

 

या कमेटीमध्ये 29आणि 30 डिसेंबर रोजी मॅरथॉन बैठक घेणअयात आली आणि वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी वाटून देण्यात आली.

 

 

या कमेटीने १०हून अधिक राज्यातील नेत्यांची भेट घेतली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस 290 जागांवर ‘एकला चलो रे’चा मार्ग स्वीकारत निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे.

 

 

काँग्रेस हायकमांडचा विचार आहे की, 2019 सालच्या निवडणुकीत पक्षाला ज्या जागांवर विजय मिळाला होता तेथे आणि ज्या जागांवर पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता तेथे उमेदवार द्यावेत.

 

 

काँग्रेसने अशा 290 जागांची यादी तयार केली आहे, जेथे काँग्रेस निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे. काँग्रेसने डेटा गोळा केल्यानंतर ज्या जागांवर निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे,

 

 

 

ती जागा कुठल्याही परिस्थितीत न सोडणयाच काँग्रेसचा विचार आहे. काँग्रेसने मागील दोन निवडणूकांचा डेटा लक्षात घेऊन फॉर्म्यूला ला तयार केला आहे.

 

 

 

पक्षाच्या हायकमांडने बिहार, यूपी, उत्तराखंड, गुजरात, जम्मू-काश्मीर, केरळ, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या नेत्यांची बैठक घेतली आहे.

 

 

 

या बैठकांसंबधी रिपोर्ट पक्षाच्या हायकमांडला देण्यात आली आहे. अलायंस कमेटी प्रत्येक राज्यात एक नोट तयार करण्यास सांगितले आहे. तसचे पत्येक राज्यात वाटाघाटीच्या वेळी या कमेटीतील सदस्यांना पुढे केले जाण्याची शक्यता आहे.

 

 

 

जम्मू-काश्मीरमध्ये 2, लडाखमध्ये 1, पंजाबमध्ये 6 प्लस, चंदीगडमध्ये 1, हिमाचल प्रदेशमध्ये 4, हरियाणामध्ये 10, दिल्लीमध्ये 3, राजस्थानमध्ये 25,मध्य प्रदेशमध्ये 29, छत्तीसगडमध्ये 11, उत्तर प्रदेशमध्ये 15- 20, उत्तराखंडमध्ये 5,

 

 

 

बिहारमध्ये 6 ते 8, गुजरातमध्ये 26, ओडिशात 21, पश्चिम बंगालमध्ये 6 ते 10, आंध्र प्रदेशात 25, तेलंगणात 17, कर्नाटकात 28, महाराष्ट्रात 16 ते 20, तामिळनाडूमध्ये 8, केरळमधील 16,

 

 

गोव्यातील 2, झारखंडमधील 7 आणि ईशान्येकडील राज्यांमधील 25 जागांवर निवडणूक लढवण्याची योजना आखण्यात आली आहे.

 

 

 

मात्र विरोधी पक्षांमधील सहकारी पक्षांशी चर्चेनंतरच जागावाटपाचा फॉर्म्यूला फायनल केला जाईल. लोकसभेसाठी एकूण 543 जागा आहेत.

 

 

चालू वर्षात काही महिन्यानंतर निवडणूका होणार आहेत. या निवडणूकीत एनडीएच्या विरोधात 28 विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी तयार केली आहे.

 

 

 

राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, हरियाणा, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यांमध्ये एकट्याने निवडणूक लढवण्याचा विचार करत आहे.

 

 

2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीएने 351 जागा जिंकल्या होत्या आणि UPA ने 90 जागा जिंकल्या होत्या. एकट्या भाजपला 303 तर काँग्रेसला 52 जागांवर समाधान मानावे लागले होते.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *