चौथी फेल ए रामा नायक यांच्या रेस्टॉरंटच्या चवीची अंबानी कुटुंबाला भुरळ
Chauthi Fail A Rama Nayak's restaurant taste charms the Ambani family

आशियातील गडगंज श्रीमंत मुकेश अंबानी यांची खाण्यासाठीची आवड कोणापासूनही लागलेली नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी खाण्यापिण्याचे भरपूर शौकीन आहेत.
आपला धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि त्याची प्रेयसी राधिका मर्चंटच्या-प्री-वेडिंग सोहळ्यात खाण्याच्या प्रति त्यांची आवड कॅमेरात कैद झाली.
अनंत आणि राधिका मर्चंटच्या ‘अन्नदान’ सोहळ्यात मुकेश अंबानी गरमागरम मिरची भजीचा आस्वाद घेताना दिसले.
मुकेश अंबानींना पहिल्यापासूनच खाण्याची आवड असून कॉलेजच्या दिवसांपासून त्यांना मुंबईतील एका रेस्टॉरंटमधील खाण्याची एवढी आवड आहे की अब्जाधीश उद्योगपती आजही दर आठवड्याला त्या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करतात. खुद्द मुकेश यांनी याबाबत सांगितले होते.
रिलायन्सच्या अध्यक्षांना मुंबईतील तब्बल ८८ वर्ष जुने रेस्टॉरंटमधील खाणे खूप आवडते. मुकेश यांना पारंपरिक गुजराती जेवणाइतकेच दक्षिण भारतीय पदार्थही आवडतात. केवळ मुकेशच नाही तर त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यही या रेस्टॉरंटच्या जेवणाचे शौकीन आहेत.
मुंबईच्या माटुंगा येथील कॅफे म्हैसूर अंबानींच्या आवडत्या रेस्टॉरंटपैकी एक असून जवळपास दर आठवड्याला उद्योगपती या रेस्टॉरंटमधून जेवण ऑर्डर करतात.
या रेस्टॉरंटशी अंबानींचे कॉलेजच्या दिवसांपासूनचे नाते आहे. त्याला मित्र आणि परिवारासह अंबानींना येथे जायला खुप आवडायचे.
शुद्ध शाकाहारी अन्नासाठी कॅफे म्हैसूरची ओळख आहे. मुकेश यांना जितके मसालेदार पदार्थ आवडतात तितकेच दक्षिण भारतीय पदार्थ देखील आवडतात. दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांसाठी अंबानी या रेस्टॉरंटला सर्वाधिक पसंती देतात.
१९३६ मध्ये सुरू झालेले कॅफे म्हैसूर मुंबईतील सर्वात जुन्या रेस्टॉरंटपैकी एक आहे. चौथी फेल ए रामा नायक यांनी या रेस्टॉरंटचा पाया घातला होता. रामा यांनी शिक्षण सोडून किंग सर्कल रेल्वे स्टेशनजवळ इडली
आणि डोसा विकायला सुरुवात केली. लोकांना त्यांचा इडली आणि डोसा इतका आवडला की त्यांच्या छोट्याशा दुकानापुढे खाण्यासाठी लांबच लांब रांगा लागायला लागल्या.
विशेष म्हणजे माटुंगा येथील हे पहिले दक्षिण भारतीय रेस्टॉरंट होते त्यानंतर त्यांनी आणखी तीन रेस्टॉरंट्स उघडले, जे सांभाळायची जबाबदारी आपल्या चारही मुलांकडे दिली.
यामध्ये उडुपी कृष्ण भवन, कॅफे म्हैसूर, उडुपी कॅफे आणि इडली हाऊस यांचा समावेश असून त्यांनी या रेस्टॉरंटना एक ब्रँडचा दर्जा मिळवून दिला.
आजही या सर्व रेस्टॉरंटमध्ये लगेच टेबल मिळणे सोपे नाही. या हॉटेलमध्ये दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ प्रेमी येथे लांबून येतात.
आतापर्यंत देभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी म्हैसूर कॅफेमध्ये जेवायची चव चाखली आहे. भाजपच्या नेत्या स्मृती इराणी आणि मुख्तार अब्बास नकवीही येथे जेवताना दिसले आहेत.
कॅफे म्हैसूरचा इडली-सांबर हा मुकेश अंबानींचा आवडता पदार्थ आहे. अनेकदा ते याच रेस्टॉरंटमधून ऑर्डर करतात आणि इडली सांबार व्यतिरिक्त मुकेश यांना इथला डोसाही आवडतो.