तब्बल ११ वर्षानंतर नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी दोघांना जन्मठेप, तिघे निर्दोष
After 11 years, two sentenced to life imprisonment, three acquitted in Narendra Dabholkar murder case

ड़ॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुण्यात विशेष न्यायालयाने आज निकाल दिला. ११ वर्षे चाललेल्या या खटल्यात पाच जणांविरुद्ध आरोप निश्चिती करण्यात आली होती.
मात्र यापैकी तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे तर दोन आरोपींना दोषी ठरवण्यात आली आहे. दोघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर अशी दोषी आरोपींची नावे आहेत.
अंनिसचे प्रमुख नरेंद्र दाभोलकर यांची २०१३ मध्ये मॉर्निंग वॉकला गेले असताना पुण्यात हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातून विरेंद्र तावडे, विक्रम भावे
आणि संजीव पुनाळेकर यांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. संजीव पुनाळेकर यांनी तपास अधिकाऱ्याविरोधात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
कोर्टाच्या निकालाचं नरेद्र दाभोलकर यांचे पुत्र हमीद दाभोलकर यांनी स्वागत केलंय. तर मुक्ता दाभोलकर यांनी सुटका झालेल्यांच्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं.
ज्यांनी गोळ्या झाडल्या त्यांनाच शिक्षा झाली. ते बळीचा बकरा होते पण ज्यांनी त्यांच्या डोक्यात भरवलं त्यांना शोधणं गरजेचं असल्याचं मुक्ता दाभोलकर म्हणाल्या. दाभोलकर कुटुंबियांनी या प्रकरणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ आणि पूर्ण न्याय मिळेपर्यंत लढा देऊ असं म्हटलं आहे
. तर याप्रकरणातील आरोपी वीरेंद्र तावडे, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना कोर्टाने निर्दोष ठरवलं आहे. तावडे, पुनाळेकर आणि भावे यांच्याविरोधातील आरोप सिद्ध होत नाही, असं कोर्टाने म्हटलं. विशेष सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या निकालाकडे राज्याचं लक्ष लागलं होतं.
कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय. सचिन अंदुरे आणि शरद कळसकर दोषी आहेत.यात फाशीची शिक्षा होऊ शकत नाही.
दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा कोर्टाने सुनावली असून पाच लाखांचा दंडही भरावा लागणार आहे. तर, डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, वकीस संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावेची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 च्या सकाळी सव्वासातच्या सुमारास पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी पाच आरोपींविरोधात खटला चालवण्यात आला. ज्यात वीरेंद्र तावडे, सचिन अंदूरकर, शरद कळसकर, वकील संजीव पुनाळेकर
आणि त्यांचा सहाय्यक विक्रम भावे यांचा समावेश होता. यापैकी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे सध्या जामीनावर बाहेर आहेत.
कट रचल्याचा आरोप असलेल्या वीरेंद्र तावडे याला निर्दोष ठरवण्यात आल्याने दाभोलकर कुटुंबाने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
दोघांना शिक्षा झाली हे न्यायव्यवस्थेवरील विश्वास दर्शवते. पण सुटलेले आरोपी आहेत, त्यांच्याविरोधात आम्ही वरच्या कोर्टात धाव घेऊ, असं हमीद दाभोलकर यांनी सांगितलं.
डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणाचा निकाल आज जाहीर करण्यात आला. तब्बल 11 वर्षांनी प्रकरणाचा निकाल जाहीर करण्यात आला.
याप्रकरणी तीन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं असून दोन आरोपींना दोषी ठरवलं गेलं आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता,
परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, पुनाळेकर आणि भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही,
त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवलं जात आहे. कळसकर आणि अंदुरे यांनी दाभोलकरांची हत्या केल्याचं सिद्ध होतंय, त्यामुळे दोघांना सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात निकाल आला. एकूण पाच आरोपींना केसला सामोरं जावं लागलं. यामधील वीरेंद्र तावडे कटकारस्थानाच्या आरोपातून मुक्त केलं, संजीव पुनाळेकर यांना शस्त्र नष्ट करण्याचा आरोप होता, त्यांना निर्दोष केलं. शिवाय विक्रम भावे यांनाही निर्दोष सुनावलं.
सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि पाच लाखांची दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. जर दंड न भरल्यास एक वर्षाची अतिरिक्त शिक्षा असेल.
जो निकाल आला आहे त्या निकालाचा आदर करतो, पण उर्वरीत आरोपींना निर्दोष सुनावण्यात आल्याने, आम्ही या निकालाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेऊ, असं दाभोलकरांच्या वकिलांनी सांगितलं.