तलाठी भरतीचा निकाल जाहीर झाल्यानंतर व्यक्त होतोय संताप;काय आहे कारण?

 

 

 

 

तलाठी भरती परीक्षेचा निकाल ५ जानेवारी रोजी जाहीर झाला आहे. तसेच भूमी अभिलेख विभागाने ६ डिसेंबर रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका जाहीर केली होती.

 

 

या आधी २८ सप्टेंबर २०२३ रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता.

 

 

तलाठी भरतीचा निकाल समोर येताच स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने निकालावर आक्षेप घेतला आहे. निकालामध्ये प्रचंड गोंधळ झाला असून जुन्या परीक्षेत नापास झालेले काही उमेदवार या परीक्षेत

 

 

दोनशेहून अधिक गुण घेत उत्तीर्ण झाल्याचा आरोप केला आहे. तसेच ज्या काही उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत असे उमेदवार परीक्षेत पास झाल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. त्यामुळे तलाठी भरती पुन्हा एकदा वादात सापडली आहे.

 

 

 

स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यांच्या एक्सवर केलेल्या आरोपानुसार, दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहेत. परीक्षांमध्ये पण फक्त १५ दिवसांचा गॅप असेल.

 

वनरक्षक मध्ये ५४ गुण आणि तलाठीमध्ये २०० पैकी २१४ गुण घेऊन टॉप केलं आहे. यावरून समजून जावे की, पेपर कसे झाले आणि मार्क कसे पडले.

 

 

९९ टक्के जागा विकल्या आहेत. सर्व निवड झालेल्या मुलांची न्यायालयीन एसआयटीमार्फत चौकशी झाली पाहिजे. तसेच या सर्व मुलांनी कोणत्या सेंटरवर पेपर दिला आहे आणि यांची रॉ मार्क किती आहेत हे सर्वांना समजले पाहिजे.

 

 

यांची सर्वांची सीसीटीव्ही पब्लिक करायला पाहिजे. सध्याचा सर्वात मोठा घोटाळा हा तलाठी भरतीमध्ये झाला आहे, असा आरोप केला आहे.

 

 

तलाठी भरतीत मोठा घोटाळा झाल्याचे आमचे आधीपासूनच मत आहे, निकालानंतर त्यास दुजोरा मिळताना दिसतो आहे. तलाठी भरतीत ज्या मुलांवर आधी पेपरफुटीचे गुन्हे दाखल आहेत,

 

 

 

अशा बऱ्याच मुलांना १९० पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. काही मुले तर गुन्हे दाखल असताना खोटी चारित्र प्रमाणपत्र काढून

 

 

ते व्हेरिफिकेशन वेळेस दाखऊन दुसऱ्या पदावर नोकरी करत आहेत. त्यामुळे या सर्व प्रकारची चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *