तिसरं महायुद्ध जवळ? इराणने केली जगाची कोंडी, स्ट्रेट ऑफ होर्मूजचे महत्त्व काय?
Is World War III near? Iran has created a world crisis, what is the importance of the Strait of Hormuz?


मध्य-पूर्वेत दिवसागणिक परिस्थिती बिघडत आहे. इराण आणि इस्त्रायलमधील लढाईत आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेने फोर्डो, नतांज आणि इस्फहान, इराक मधील या तीन अणूऊर्जा प्रकल्पावर हल्ला केला.
जगातले 10 सर्वात असुरक्षित देश
तर तिकडे इराणी संसदेने ‘स्ट्रेट ऑफ होर्मूज’ बंद करण्यास मंजूरी दिली. इराणने जणून जगाची कोंडी केली आहे. त्यामुळे इंधन तुटवडा नाही तर इतरही अनेक वस्तूंचा व्यापार आणि वाहतुकीवर परिणाम होणार आहे.
जगातील जवळपास 20 टक्के इंधन आणि गॅसचा पुरवठा, वाहतूक ही होर्मूज मार्गे होते. या जलमार्गाच्या एका बाजूला इराणची सीमा तर दुसर्या बाजूला ओमान आणि UAE हे दोन देश आहेत. हा मार्ग पर्शियन आखाताला अरबी समुद्र आणि हिंद महासागराला जोडतो.
मातोश्री’वरून सर्वात मोठी अपडेट;शिवसेना ठाकरे गट, मनसे युती होणार? ‘
त्याच्या सर्वात अरूंद ठिकाणी 33 किलोमीटर रुंद असा कालवा इराणला अरबी द्वीपकल्पापासून स्वतंत्र करतो. उत्तरेला इराण तर दक्षिणेला अरब सागर आहे.
याच समुद्री मार्गाने जवळपास एक तृतीयांश तेलवाहक जहाज जातात. आता इराणी संसदेने हा समुद्रीमार्ग बंद करण्यास मंजूरी दिल्याने एक प्रकारे नाकाबंदी झाली आहे. इराणने कोंडी केल्याने तेलाची, इंधनाची वाहतूक थांबेल आणि जगात इंधनाचे दर भडकतील. व्यापारावर विपरीत परिणाम होईल.
सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला सुनावले,म्हणाल्या अजूनही उशीर झालेला नाही’
काही वृत्तांनुसार, हा जलमार्ग ताब्यात घेण्यासाठी अमेरिका अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. या ठिकाणी वचक ठेवण्याची अमेरिकेची जूनी रणनीती आहे. या जलमार्गावर जवळपास 33 कोटी 39 लाख लिटर कच्चा इंधनाचा पुरवठा करण्यात येतो.
अमेरिकन ऊर्जा माहिती प्रशासनानुसार, या जलमार्गे कच्चा तेलाचा पुरवठा करण्यात येतो. त्यात भारत, जपान, दक्षिण कोरिया, चीन सारख्या आशियायी देशांचा 80-85 टक्के वाटा असतो. म्हणजे जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा भारत,
मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या अनुदानात 100 कोटींचा घोटाळा,21अधिकाऱ्यांचे निलंबन
एकूण कच्चा तेलाच्या जवळपास 40 टक्के आणि नैसर्गिक गॅसचा जवळपास अर्धा भाग होर्मुज जलमार्गाने आयात करतो. भारताचे इस्त्रायल, इराण आणि या भागातील सर्वच देशांशी चांगले संबंध असल्याने पुरवठ्यावर परिणाम होणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.
इंधन आणि नैसर्गिक गॅससाठी रशिया, अमेरिका आणि ब्राझील या देशातून इंधन आयातीचा एक पर्याय भारतासमोर आहे. पण जगातील इतर देशांवर त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
महविकास आघाडी फुटणार ?संजय राऊत म्हणतात ;राज्यात दोनच समविचारी पक्ष
दरम्यान अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सोमवारी (23 जून 2025) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत.
1 जुलैपासून PAN कार्ड बनविण्याचे नियम बदलणार
त्यापूर्वी पुतिन यांचे निकटवर्ती आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चिंता वाढली आहे. आता नेमकं काय झालं? चला जाणून घेऊया..
रशियन सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यावर आरोप केला की, त्यांनी अमेरिकेला एका नव्या युद्धात ढकलले आहे. मेदवेदेव म्हणाले, “शांतता प्रस्थापित करणारे राष्ट्राध्यक्ष म्हणून आलेल्या ट्रम्प यांनी अमेरिकेसाठी नवे युद्ध सुरू केले आहे.”
हॉट एअर बलूनला आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू ;पाहा VIDEO मृत्यूचा थरार
अमेरिकेच्या हवाई हल्ल्यावर प्रश्न उपस्थित करताना रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, या हल्ल्यात इराणच्या पायाभूत सुविधांचे विशेष नुकसान झाले नाही किंवा केवळ किरकोळ नुकसान झाले आहे. ते म्हणाले, “आता आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो की, इराण भविष्यात अणवस्त्रांचे उत्पादन सुरू ठेवेल.”
इस्रायल-इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात काय काय महागणार ?
दिमित्री मेदवेदेव यांनी दावा केला की, “अनेक देश इराणला थेट आपली अणवस्त्रे पुरवण्यास तयार आहेत.” मात्र, ते कोणत्या देशांबद्दल बोलत आहेत, हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
मेदवेदेव पुढे म्हणाले की, इस्रायलची लोकसंख्या आता सतत धोक्यात जगत आहे, देशाच्या अनेक भागांत स्फोट होत आहेत. ते म्हणाले, “अमेरिका आता एका नव्या संघर्षात अडकली आहे, ज्यात जमिनीवर कारवाई होण्याची शक्यता दिसत आहे.”
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजा-वादळांसह पावसाचा अंदाज
त्यांनी असेही म्हटले की, या हल्ल्यांमुळे इराण राजकीयदृष्ट्या अधिक मजबूत झाला आहे. रशियन नेते म्हणाले, “इराणचे राजकीय शासन टिकून आहे आणि कदाचित ते आणखी मजबूत झाले आहे. लोक देशाच्या आध्यात्मिक नेतृत्वाभोवती एकत्र येत आहेत, ज्यात ते लोकही सामील आहेत जे पूर्वी याबाबत उदासीन किंवा विरोधी होते.”
STमहामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याची योजना ?
दरम्यान, इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी सध्याच्या परिस्थितीत तेहरान अणुकरार चर्चेत पुन्हा सहभागी होईल, हे नाकारले आहे. ते म्हणाले, “आम्ही कूटनीतीच्या मध्यात होतो. आम्ही अमेरिकेशी चर्चे करत होतो,
तेव्हा इस्रायलने त्यांच्यावर हल्ला केला.” ते म्हणाले की, अमेरिकेच्या हल्ल्याच्या अवघ्या दोन दिवस आधी जिनिव्हामध्ये युरोपीय मध्यस्थांशी चर्चा सुरू होती. याच दरम्यान अमेरिकेने आमच्या अणुस्थळांवर हल्ला केला. इराणने नव्हे, तर अमेरिकेनेच विश्वासघात केला आहे.