नागपूर लोकसभा; मतमोजणीत एक केंद्रावरील मते मोजण्यात येणार नाही;काय घडले कारण?

Nagpur Lok Sabha; Votes from one center will not be counted in counting; what happened because?

 

 

 

 

नागपूर लोकसभा मतदारसंघातील एका पोलिंग बुथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे.

 

 

 

 

या केंद्रावर ‘मॉक पोल’ची मते ‘क्लीअर’ न करताच मतदान घेतले गेले. त्यामुळे या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.

 

 

 

मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग (प्रारूप मतदान) घेण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिजल्ट क्लीअर (सीआरसी) करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते.

 

 

 

मात्र, रविनगर येथील मतदान केंद्र क्र. २३३, दादाजी धुनीवाले महापालिका उच्च प्राथमिक शाळा या केंद्रावर मॉक पोलिंग क्लीअर न करताच मतदान घेण्यात आले.

 

 

 

या मतदान केंद्रावर एकूण ८६५ मतदान होते. त्यापैकी ३१५ जणांनी मतदान केल्याचे १७ सी फॉर्मनुसार दिसून येत आहे. यातही मॉक पोल किती आणि किती जणांनी मतदान केले हे समजून येत नाही.

 

 

 

 

नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्राचे साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ३० एप्रिल रोजी नागपूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना याबद्दल कळविले.

 

 

 

मात्र, याबाबतची माहिती मतदानाच्या दिवशीच (१९ एप्रिल) रोजीच समोर येणे गरजेचे होते. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी १५ मे रोजी सर्व उमेदवारांना एका पत्राद्वारे याबाबत कळविले असल्याचे दर्शविण्यात आले.

 

 

 

मात्र, प्रत्यक्षात सूत्रांकडून ही बाब आम्हाला २४ मे रोजी कळाली. तसेच निवडणूक अधिकाऱ्यांकडून आजपर्यंतही अशाप्रकारचे कुठलेही पत्र आम्हाला प्राप्त झाले नाही. यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार केली, असे विकास ठाकरे यांनी सांगितले.

 

 

 

गंभीर बाब म्हणजे, १५ मे रोजीच्या पत्रानुसार, ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीत या केंद्रावरील मते मोजण्यातच येणार नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने जाहीर केले आहे.

 

 

 

 

तसेच व्हीव्हीपॅट स्लीपद्वारे अनिवार्य पडताळणीकरिता निवडता येणाऱ्या पाच केंद्रांमध्येही या केंद्राचा समावेश करता येणार नाही. प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे आधीच अनेकांची नावे मतदारयादीतून गहाळ होती.

 

 

 

त्यामुळे मतदानाची टक्केवारी घसरली. दुसरीकडे लोकांनी मतदान केल्यावरही त्यांची मते मोजण्यात येणार नसल्याचे फर्मान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढले असल्याने मतदारांचा अपमान केला गेला,

 

 

 

 

असा आरोप विकास ठाकरे यांनी केला. चूक झाली असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी सांगितले. माहिती लपविली नसून ४ जूनपर्यंत केव्हाही देता येऊ शकते.

 

 

 

 

मतमोजणीच्या वेळी ३१५ मतांचा फरक असेल तरच या मतांचा विचार केला जाईल. व्हीव्हीपॅटची मते अंतिम समजल्या जाईल, असे महिरे म्हणाले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *