नाशिक लोकसभेवरून मराठा विरुध्द ओबीसी?संघर्षं चिघळला

The Maratha vs. OBC? struggle raged over the Nashik Lok Sabha seat

 

 

 

 

नाशिकच्या जागेवरुन महायुतीत तिढा कायम असला तरी या जागेवरुन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना महायुतीकडून उमेदवारी देण्याचे संकेत आहेत.

 

 

 

 

पण नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी दिल्यास 48 मतदारसंघात महायुतीला विरोध करू असा इशारा सकल मराठा समाजाने दिला आहे.

 

 

 

 

छगन भुजबळांविरोधात मराठा समाज आक्रमक झाला आहे. नाशिकमधील मराठा आंदोलकांनी भुजबळांना पाडण्याच प्रण केलाय. याला ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेडगे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

 

 

 

नाशिकमध्ये छगन भुजबळांना लोकसभेचं तिकिट मिळाल्यास मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळू शकतो. तूम्ही एक भूजबळ पाडला तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशारा प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला आहे.

 

 

 

 

 

छगन भुजबळ हे आमेच नेते आहेत, ते कोणत्या पक्षात आहेत, त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, पण त्यांना उमेदवारी दिली तर आण्ही त्यां्या पाठीशी उभे राहाणार अशी भूमिका प्रकाश अण्णा शेंडगे यांनी घेतली आहे.

 

 

 

 

नाशिक जिल्ह्यात 15 टक्के मराठा आणि 60 टक्के ओबीसी आहेत. त्यामुळे भुजबळांना पाडणं शक्य नाही असंही शेंडगे यांनी स्पष्ट केलंय. तुम्ही एक भुजबळ पाडाल तर आम्ही 160 मराठे पाडू असा इशाराच प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिला.

 

 

 

गेले काही महिने राज्याचं राजकारण फक्त आरक्षणाच्या बाजूने सुरु आहे. 57 लाख कुनब्यांचे दाखले देण्यात आलेत, पण आमच्या आरक्षणाची लढाई आम्हाला मत पेटीतून लढायची आहे असंही शेंडगे यांनी म्हटलंय.

 

 

 

 

प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषद घेत ओबीसी बहजुन पार्टीच्या उमेदवारांची तिसरी यादी जहीर केली. लोकसभा पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय.

 

 

 

बीडमध्ये यशवंत अण्णा गायके, जालन्यात डॉ. तानाजी भोजने, अहमदनगरमध्ये दिलीप खेडकर आणि साताऱ्यात सुरेश कोर्डे यांना उमेवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

 

 

 

 

परभणीमध्ये ओबीसी बहुजन पार्टीने महादेव जानकर यांना पाठिंबा दिला आहे. ओबीसी मतात विभाजन नको म्हणून हरिभाऊ शेळके यांनी येथून आपली उमेदवारी मागे घेतली आहे.

 

 

 

 

बीडमध्ये पंकजा मुंडे यांना मराठा समाजाकडून ठिकठिकाणी विरोध होत आहे. बीडमध्ये आम्ही टी पी मुंडे यांना लढण्याची विनंती करत होतो,

 

 

 

 

पण यशवंत अण्णा गायके या धनगर समजतील तरुण तडफदार मुलाचं नाव मुंडेंनी सांगितलं अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिलीय.

 

 

 

जालन्यात रावसाबेह दानवे यांच्याविरोधातही ओबीसी बहुजन पार्टीने उमेदवार दिला आहे. जालन्यात डॉ. तानााजी भोजने यांची रुग्णालयं आहेत, त्यांचा जनसंपर्क चांगला आहे,

 

 

 

 

गोरगरीबांसाटी त्यांनी मोफत काम केलं आहे. त्यामुळे दानवे यांच्याविरोधात भोजने यांना उमेदवारी दिल्याचं शेंडगे यांनी सांगितलं.

 

 

 

 

अहमदनगरमध्ये निलेश लंके आणि सुजय विखे पाटील यांच्यासमोबर आम्ही दिलीप खेडकर हा स्ट्राँग उमेदवार दिला असून सांगलीत आपण स्वत: लढणार असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी सांगितलं.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *