नीट परीक्षा गैरव्यवहार;मराठवाड्यातील एक शिक्षक फरार

NEET exam malpractice; a teacher absconding from Marathwada

 

 

 

 

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणानंतर देशभरात खळबळ माजली आहे. परीक्षेतील पेपर फूट प्रकरणात विरोधकांनीही केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

 

 

 

 

यामुळे केंद्र सरकार खळबळून जागे झाले आहे. केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिला आहे. तसेच राष्ट्रीय चाचणी संस्थेचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांची हकालपट्टी केली आहे.

 

 

 

 

तपास हातात घेताच सीबीआयने या प्रकरणात जोरादार कारवाई सुरु केली आहे. सीबीआयने या प्रकरणातील बडे मासे जाळ्यात ओढण्यासाठी काम सुरु केले आहे.

 

 

 

 

 

सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहार ते गुजरातमधील गोध्रापर्यंतच्या एफआयआरची छाननी केली. आता सीबीआय एनटीए अधिकाऱ्यांचीही चौकशी करण्याची शक्यता आहे.

 

 

 

 

दुसरीकडे एनटीएमधील अंतर्गत सुधारणा आणि परीक्षा प्रक्रियेतील सुधारणांबाबत उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली आहे.

 

 

 

भविष्यात परीक्षा पूर्णपणे गैरव्यवहापासून मुक्त करणे आणि कायद्याच्या कठोरतेशिवाय केंद्र निवडीपासून परीक्षेच्या देखरेखीपर्यंत इतर कठोर पावले सरकारकडून उचलली जात आहे.

 

 

 

नीट परीक्षेतील गैरव्यवहार प्रकरणी एटीएसच्या पथकाने लातूरमधून दोन शिक्षकांना रविवारी ताब्यात घेतले होते. संजय जाधव आणि जलील पठाण असे या दोन शिक्षकांची नावे आहेत.

 

 

 

चौकशी करुन त्यांना सोडून दिले होते. आता त्याच दोन शिक्षकांवर लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नीट परीक्षेत गैरव्यवहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

विशेष म्हणजे हा गुन्हा एटीएसच्या बाजूने दाखल करण्यात आला आहे. लातूर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि एटीएसचे पथक शिक्षक जलील पठाण यांची चौकशी करीत अधिक माहिती मिळत होते.

 

 

 

 

एटीएसने चौकशीनंतर घरी गेलेले संजय जाधव मात्र त्यानंतर फरार झाले. ते पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. त्यामुळे लातुर पोलिसांची पथके त्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहेत.

 

 

 

 

जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागही खडबडून झाला आहे. जलील पठाण मुख्याध्यापक असलेल्या शाळेतील महत्वाचे दप्तर सील करण्यात आले आहे. आता प्रकरणाचा अतिशय गोपनियतेने तपास करण्यात येत आहे.

 

 

 

नीट यूजी परीक्षेतील घोटाळ्याचे महाराष्ट्रातील धागेदोरे उघड झाल्यानंतर आता 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी ताब्यात घेतलेल्या लातुरातील दोन शिक्षकांना चौकशीनंतर रात्री उशिरा सोडून देण्यात आले होते.

 

 

 

 

मात्र, त्यांच्या सुटकेला 12 तासही उलटत नाहीत तोच रविवारी पुन्हा एक शिक्षकाला अटक करण्यात आली. नीटमध्ये गुण अधिकचे मिळवून देण्यासाठी लातूरचे दोन जण काम करत असल्याचे एटीएसच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.

 

 

 

 

त्यामुळे या दोन शिक्षकांसह धाराशिव आणि दिल्ली येथील एक जण अशा चौघांविरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लातूरहून पैसे धाराशिवला नंतर दिल्लीला पाठवण्यात येत होते.

 

 

 

 

लातूर येथील संजय तुकाराम जाधव (४०, जि. प. प्राथमिक शाळा, टाकळी, ता. माढा) आणि जलिलखान उमरखान पठाण (३४, मुख्याध्यापक, जि. प. प्राथमिक शाळा, कातपूर, ना. जि. लातूर) हे दोघे नीट परीक्षेत गैरव्यवहार करत उमेदवारांना परीक्षा पास करून देण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहितीवरून

 

 

 

नांदेडच्या दहशतवाद विरोधी पथकाचे पथकाने लातुरातून जाधव आणि पठाण यांना शनिवारी ताब्यात घेऊन त्यांची रात्री उशिरापर्यंत चौकशी करून सोडून दिले होते. पठाणला रात्री अटक झाली आहे.

 

 

 

एटीएसने त्यांचे मोबाइल तपासले असता धक्कादायक माहिती समोर आली. त्यांच्या फोन गँलरीमध्ये 12 वर विद्यार्थ्यांच्या परीक्षा प्रवेशपत्रांच्या प्रती आढळल्या.

 

 

 

या सोबतच परीक्षा व उमेदवारांसंदर्भात अनेक व्हॉटस्ऍपचॅट आढळले. जलिलखान पठाण याने संजय जाधव पास काही प्रवेशपत्रांच्या प्रती आणि आर्थिक व्यवहारासंदर्भात व्हॉट्सअप मेसेज पाठवल्याचे दिसून आले.

 

 

 

संशयित संजय जाधव याने पैशांच्या मोबदल्यात परीक्षा पास करण्याचे आश्वासन देऊन अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरन्ना मष्णाजी कोनगलवार (नेमणूक औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उमरगा, जि. धाराशिव) यास व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाठवल्याचे कबूल केले.

 

 

 

संजय जाधव याच्या माहितीनुसार, इरन्ना कोनगलवार हा पुढे दिल्ली येथील एका गंगाधर नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात आला.

 

 

त्याच्या माध्यमातून नीट-२०२४ परीक्षेमध्ये पैशाचे मोबदल्यात प्रवेश मिळून देण्याचे अवैध काम करीत आहे. प्राथमिक चौकशीत दोषी आढळताच दहशतवाद विरोधी पथकाच्या वतीने लातुरातील दोन शिक्षकांसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

 

 

दरम्यान NEET यूजी परीक्षेवरुन देशभरात गोंधळ सुरु आहे. बिहार, झारखंड, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यातून पोलिसांनी काही जणांना अटक केली आहे. देशातून एकूण 110 मुल तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत.

 

 

केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 47 विद्यार्थ्यांना डीबार्ड करण्यात आलं आहे. अन्य विद्यार्थ्यांची चौकशी सुरु आहे. पेपर लीक कसा झाला? ते शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.

 

 

 

 

देशभरातील 67 टॉपपरवर संशय आहे. या टॉपर्सना काऊन्सिलिंगमध्ये जाण्याची परवानगी असेल. तपासादरम्यान काही चुकीच केल्याच आढळून आल्यास त्यांची दावेदारी रद्द होईल.

 

 

 

नीट यूजी परीक्षेवरुन एनटीएवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विद्यार्थ्यांपासून अनेक राजकीय पक्ष एनटीएवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत.

 

 

 

शिक्षण मंत्रालयानुसार, सर्वात मोठी चूक परीक्षेच्यावेळी झाली. देशातील काही सेंटर्सवर परीक्षा उशिराने सुरु झाली. या सेंटर्सवरील मुलांनीच परीक्षा उशिराने सुरु झाल्याचे आरोप केले होते.

 

 

 

 

शिक्षण मंत्रालयानुसार, जितक्या उशिराने परीक्षा सुरु झाली, तितका अतिरिक्त वेळ त्या मुलांना द्यायला पाहिजे होता. प्रश्न तिथेच मिटला असता.

 

 

 

शिक्षण मंत्रालयाच्या मते, सगळ्या समस्येच मूळ ग्रेस मार्कपासून सुरु झालं. परीक्षा उशिराने सुरु झाल्याने हे ग्रेस मार्क्स देण्यात आले. ग्रेस मार्कावरुन पालक कोर्टात गेले. ग्रेस मार्कांऐवजी विद्यार्थ्यांना वेळ दिला असता, तर अशी स्थिती निर्माण झाली नसती.

 

 

 

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर रविवारी 23 जूनला री टेस्ट झाली. फक्त 52 टक्के विद्यार्थीच या री टेस्टमध्ये सहभागी झाली होती. शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनुसार,

 

 

 

परीक्षेत केवळ 813 विद्यार्थी सहभागी झाले. 750 विद्यार्थी अनुपस्थित होते. झज्जरमध्ये 494 पैकी फक्त 287 विद्यार्थी परीक्षेसाठी गेले.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *