प्रसव वेदना होणाऱ्या महीलेला पलंगावर झोपवून पुराच्या पाण्यातुन रुग्णालयात हलविले

A woman suffering from labor pains was laid on a bed and shifted to the hospital from the flood waters

 

 

 

आंबा चौंडी / अ.माजीद सिद्दिकी

 

गेल्या दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील स्थिती अतिशय गंभीर बनली असून ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील नदी ,नाले, ओढे तुंबून तुबुन भरून वाहत आहेत

 

,मुसळधार पाऊसाने नदीला पूर आल्यामुळे वसमत तालुक्यातील चौंडी बहिरोबा गावचा संपर्क तुटला . अशातच गावातील सौ ज्योती रामेश्वर किरवले या महीलेला प्रसव वेदना सुरु झाल्या ,

 

अचानक पोट दुखण्यास सुरूवात झाली अन, नदीला आलेल्या पुरामुळे शहराकडे जाणारे रस्ते बंद, पाऊस सुरु ,अशा बिकट परिस्थितीत गावात डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी उपलब्ध नाही ,

 

महिलेला प्रचंड वेदना अशा परिस्थिती काय करावे कोणालाच कळेना ,रुग्णालयात नेने आवश्यक नास्ता महिलेसह नवजातचाही जीव जाऊ शकतो अशा कठीण प्रसंगात गावातील युवकांनी शक्कल लढवून

 

नातेवाईकांच्या मदतीने गावकऱ्यांनी डिलेवरी पेशंट ला चक्क पलंगावर झोपवले एक साखळी तयार करून मोठ्या जोखमीने जिवाजी बाजी लावून पुराच्या पाण्या मधुन बाहेर रस्त्यावर काढले

 

आणि महिलेला नदीच्या बाहेर काढून वाहनातुन महीलेला पुढील उपचारास वसमत येथील शासकीय स्त्री रूगणालयात पाठवण्यात आले गावातील धाडसी तरुणांमुळे महिला व नवजात बालकाला जीवदान मिळाले आहे.

 

वसमत तालुक्यातील चौंडी बहिरोबा येथील नदी च्या वर शाम नगर वस्ती मध्यें राहणाऱ्या ग्रामस्थाची मोठी संख्या आहे ,तसेच शाळा ही नदीच्या वर आहे

 

या वस्ती कडे व शेती शिवाराकडे तसेच शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे ,पुलाची उंची कमी असल्यामुळे पाऊस पडला कि नदीला पूर येतो

 

आणि संपर्क तुटतो ,या कमी उंचीच्या पुलामुळे या पूर्वीही जिवीत हानी झाली आहे,त्यामुळे या पुलाची उंची वाढवून होणाऱ्या दुर्घटना टाळण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *