बाबा सिद्दिकींचा भर पावसात दफनविधी, झिशान सिद्दीकींनी फोडला टाहो

Baba Siddiqui's burial in the rain, Zeeshan Siddiqui broke it

 

 

 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज (दि.13) त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला.

 

बडा कब्रस्तान येथे हा दफनविधी करण्यात आलाय. काही वेळापूर्वी त्यांच्या घराबाहेरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. घराबाहेर

 

हजारो लोकांकडून ‘नमाज ए जनाना’प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार झिशान सिद्दिकी यांनी वडिलांना निरोप देताना टाफो फोडलाय.

 

 

बाबा सिद्दिकी यांची शनिवारी हत्या झाल्यानंतर आज त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी, दिग्गज नेत्यांसह सर्वसामान्य लोकांची रिघ लागलेली पाहायला मिळाली.

 

सिद्दिकी यांच्या वांद्रतील घराबाहेर आज फार मोठी गर्दी देखील पाहायला मिळाली होती. त्यांचे कार्यकर्त्यांवर आणि समर्थकांवर देखील दु:खा चा डोंगर कोसळलाय. मरीन लाईन्स येथील बडा कब्रस्तान येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

 

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांकडून आत्तापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, शनिवारी अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांनी दोघांना  न्यायालयात हजर केले होते.

 

त्यातील एका आरोपीला 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका आरोपीच्या वयाबाबतच्या टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

एका आरोपीचे वय 17 असल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला होता. वकीलांच्या युक्तीवाद गांभिर्याने घेत न्यायाधीशांना

 

त्याच्या वयासाठी आवश्यक टेस्ट घेण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय वय उघड करण्यासाठी घेण्यात आलेल्या चाचण्यानंतर त्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *