भाजपकडून या”19″ आमदारांना मंत्रिपदासाठी फोन
BJP calls these "19" MLAs for ministerial posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज रविवारी नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे. मात्र किती मंत्र्यांचा शपथविधी होणार,
घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रशासनाने नागपूरच्या राजभवनमध्ये शपथविधीची तयारी केली आहे.
रविवारी दुपारी ४ वाजता शपथविधी पार पडेल, असे राजभवनाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. २० ते २५ मंत्र्यांचा समावेश केला जाईल, अशी शक्यता आहे.
भाजपमधील काही ज्येष्ठ मंत्र्यांचा सामावेश केला जाणार नाही. त्याऐवजी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे समजते. भाजपच्या यादीबाबत मुख्यमंत्री फडणवीस हे केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करून नावे अंतिम करणार आहेत
महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होईल.
मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शपथ घेतलीय.
त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे वर्धामधील आमदार पंकज भोयर यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागणार आहे. आतापर्यंत भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत पंकज भोयर यांचं नाव समोर आलं नव्हतं.
मात्र आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकज भोयर यांना मंत्रिपदासाठी फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला.
भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फोन करत आहेत. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री आणि आज शपथ घेणारे 19 लोक असे 20 मंत्री राहतील.
अजित पवार यांचे आज 9 मंत्री शपथ घेतील. (अजितदादा धरून राष्ट्रवादीचे 10 मंत्री होतील), तर एकनाथ शिंदे यांचे 11 मंत्री आज शपथ घेतील.(एकनाथ शिंदे यांना धरून शिवसेनेचे 12 मंत्री होतील..)
काही जुन्या मंत्र्यांना वगळून त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची माहिती आहे. भाजपचे 20 शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 असे 42 मंत्री आता मंत्रिमंडळात राहतील. तर 1 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत भाजपकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे
आतापर्यंत शिवसेनेकडून कोणा कोणाला मंत्रिपदासाठी फोन-
भरत गोगावले
उदय सामंत
प्रताप सरनाईक
योगेश कदम
आशिष जैस्वाल
गुलाबराव पाटील
शंभूराजे देसाई
प्रकाश आबीटकर
संजय राठोड