भारतासह चार देश भूकंपाच्या धक्क्याने हादरले
Four countries including India were shaken by the earthquake

भारतासह चार देशांमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. तीन तासांच्या आत भारत, नेपाळ, तिबेट आणि पाकिस्तानसह काही भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले.
भारतात बिहारच्या पाटना येथे 2.35 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोक घराबाहेर आले. 5.5 रिश्टर सेक्लवर तीव्रतेचा हा भूकंप होता.
नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजीनुसार नेपाळच्या बागमती भागातही 2.35 च्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. नेपाळचा बागमती प्रांत बिहारच्या मुजफ्फरपूरपासून 189 किलोमीटर उत्तरेला आहे.
या भूकंपामुळे कुठली जिवीत अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाहीय. नेपाळच नाही, तक तिबेटमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. पाकिस्तानात सकाळी 5 वाजून 14 मिनिटांनी भूकंपाचे जोरदार झटके जाणवले.
झटके जाणवताच लोक लगेच घराबाहेर पळाले. 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा हा भूकंप होता. याआधी 16 फेब्रुवारीला सुद्धा पाकिस्तानात भूकंपाचे धक्के जाणवले होते.
भूकंपाच केंद्र रावळपिंडीपासून आठ किलोमीटरवर दक्षिण पूर्वेला आहे. भूकंपामुळे कुठे काही नुकसान झाल्याच वृत्त नाहीय.
याआधी शुक्रवारी सकाळी 2.48 मिनिटांनी तिबेटमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.1 होती. इथे सुद्धा नुकसान झालेलं नाहीय. भूकंपाच केंद्रबिंदू जमिनीपासून आत 70 किलोमीटर खोलवर होता.
वैज्ञानिक दृष्ट्या आपल्याला पृथ्वीची रचना समजून घ्यावी लागेल. पृथ्वी टॅक्टोनिक प्लेटोंवर स्थित आहे. त्याखाली तरल पदार्थ लावा आहे. त्यावर टॅक्टोनिक प्लेटस तंरगतात.
अनेकदा या प्लेट्सशी आपसात टक्कर होते. सततची टक्कर आणि जास्त दबाव वाढल्यामुळे प्लेट्स तुटतात. अशावेळी खाली तयार झालेली ऊर्जा बाहेर निघण्याचा मार्ग शोधते. त्यामुळे भूकंप होतो.








