मंत्रीमंडळ विस्तार; 9 दिग्गज माजी मंत्र्यांना डच्चू ?

9 former ministers to be sacked?

 

 

 

मागील काही दिवसांपासून राज्यात मंत्रीमंडळ विस्ताराचा पेच वाढताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा शपथविधी होऊन १० दिवसांचा कालावधी लोटला आहे.

 

तरीही राज्यात मंत्रीमंडळ विस्तार होत नाहीये. मलईदार खाती मिळवण्यासाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच बघायला मिळत आहे. मात्र अजून मंत्रीमंडळ विस्ताराचा कोणताही निर्णय झालेला नाही.

 

मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात कोण असणार? यावर शनिवारी रात्री शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येतंय. यात कोणत्या नेत्यांचा समावेश असेल,

 

याबाबतच्या नावांची घोषणा रविवारी (१५ डिसेंबर) होण्याची शक्यता आहे. मंत्रीमंडळ विस्तार अंतिम टप्प्यात आलं असलं तरी महायुतीच्या पहिल्या टर्ममध्ये मंत्री राहिलेल्या ९ आमदारांचा नव्या मंत्रीमंडळातून

 

पत्ता कट होणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून देण्यात आलीय. आता हे आमदार कोण असतील? यावरून महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात मागच्या कार्यकाळात मंत्री राहिलेल्या नऊ जणांना डच्चू मिळणार आहे. यात भाजपचे ३ मंत्री असणार आहेत.

 

एकनाथ शिंदे गटाचे सर्वाधिक ४ मंत्री असणार आहेत. तर अजित पवार गटाच्या २ मंत्र्यांना नव्या मंत्रीमंडळातून डच्चू मिळू शकतो. आता महायुती नारळ देऊ शकतो, असे नेते नेमके कोण असणार आहेत?

 

याची माहिती अद्याप समोर आली नसली तरी, मागच्या काळात निष्क्रीय राहिलेल्या आणि वाचाळवीर मंत्र्यांना घरी बसवलं जाणार असल्याची माहिती आहे.

 

या ९ जणांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. डच्चू मिळू शकतो, अशा नेत्यांमध्ये भाजपचे काही वरिष्ठ नेतेदेखील आहेत.

 

२३-१२-०९ हा महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. त्यानुसार भाजपला एकूण २३ मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे.

 

यात भाजपकडे १८ कॅबिनेट मंत्रीपदं तर ५ राज्यमंत्री असणार आहेत. दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाला १२ मंत्रीपदांवर समाधान मानावं लागणार आहे.

 

शिंदेंना ९ कॅबिनेट तर ३ राज्यमंत्रीपदं मिळणार असल्याची माहिती आहे. दुसरीकडे, ४१ आमदार निवडून आणणाऱ्या अजित पवार गटाला मात्र अवघी ९ मंत्रीपदं मिळणार आहेत. ज्यात ८ कॅबिनेट तर १ राज्यमंत्रीपद असणार आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *