मतदारांचा खासदाराला प्रश्न ;खासदार साहेब प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला?
Voter's question to the MP: How did you find time for campaigning?
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे. त्यात शिरूर लोकसभा चांगलीच चर्चेत आली आहे. आज डॉ. अमोल कोल्हे हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना
गंगापुर फाट्यावर एका सुज्ञ मतदाराने एक फलक लावत अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारले आहे. हा बॅनर सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. खासदार साहेब उत्तर द्या, असे आव्हान करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शिवाजीराव आढळराव पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून डॉ. अमोल कोल्हे हे समोरासमोर लढणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यामध्ये अमोल कोल्हे यांनी खासदार असताना पाच वर्षात जनतेशी संपर्क ठेवला नाही हा प्रमुख त्यांच्या विरोधात प्रचारातील मुद्दा बनला आहे.
अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना गंगापूर फाट्यावर एक फलक लावून अमोल कोल्हे यांना काही प्रश्न विचारण्यात आले आहेत.
यामध्ये विद्यमान खासदार साहेब पाच वर्ष तुम्ही कुठे होता. कोरोना सारख्या भयंकर परिस्थितीमध्ये तुम्ही मतदारसंघांमध्ये का नव्हता.
पाच वर्षे मतदारसंघात नाही पण प्रचारासाठी तुम्हाला वेळ कसा भेटला? खासदार साहेब उत्तर द्या एक सुज्ञ मतदार, अशा आशयाचा फलक सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
या दौऱ्यादरम्यान अमोल कोल्हे यांनी मात्र याला उत्तर दिले नसल्याचे समोर आले आहे. यावरून अमोल कोल्हे खरंच मतदारसंघात आले होते की नाही?
नागरिकांशी त्यांनी संपर्क ठेवला की नाही हा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे हा बॅनर सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.