मराठवाड्यातील अजितदादांचा दिग्गज आमदार शरद पवारांच्या गळाला ?

Veteran MLA of Ajitdad in Marathwada Sharad Pawar's neck?

 

 

 

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी केली जाईल

 

आणि निकालाची घोषणा होईल. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच आता इनकमिंग आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेल्या

 

अजित पवार गटाचे दोन आमदार सध्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याची तयारी करत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्याची चर्चा रंगली आहे. सध्या त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे.

 

तर दुसरीकडे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्याऐवजी माझा मुलगा रणजितसिंह निवडणूक लढवेल असे सांगितले आहे.

 

 

विशेष म्हणजे बबनराव शिंदे यांनी मुलासाठी शरद पवार गटाकडे तिकीटाची मागणी केल्याचेही बोललं जात आहे. त्यामुळे येत्या काळात अजित पवारांना दोन मोठे धक्के बसणार आहेत.

 

 

महायुती सरकारच्या विरोधात पत्र लिहिणारे आमदार सतीश चव्हाण हे सध्या नॉट रिचेबल झाले आहेत. सतीश चव्हाण यांनी सरकारविरोधात

 

पत्र लिहिल्यापासून त्यांचा फोन नॉट रिचेबल असल्याचे बोललं जात आहे. यामुळे सतीश चव्हाण हे महायुतीतून बाहेर पडणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

 

 

सतीश चव्हाण यांनी अजित पवार किंवा महायुतीच्या नेत्यांचा संपर्क होऊ नये, म्हणून फोन बंद केला असल्याची माहिती समोर आली आहे. सतीश चव्हाण

 

 

हे अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या पक्षात जाणार याबद्दल अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र सतीश चव्हाण शरद पवार गटात जाणार असल्याचे बोललं जात आहे

 

किंवा ते अपक्ष निवडणुकीसाठी उभे राहू शकतात. सतीश चव्हाण हे लवकरच मुंबईत बड्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

तर दुसरीकडे सोलापूर जिल्हात अजित पवार गटाला आणखी धक्का बसणार आहे. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

मला आता तब्येत साथ देत नाही. त्यामुळे मी माझा मुलगा रणजितसिंहला निवडणुकीला उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मी शरद पवारांची भेट घेतली आहे, असे बबनराव शिंदे यांनी सांगितले.

 

मी काही दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीवेळी मी शरद पवारांकडे मुलाच्या उमेदवारीची मागणी केली आहे. मी रणजितसिंहसाठी शरद पवारांकडे तिकीटाची मागणी केली आहे.

 

 

यावेळी शरद पवार हे विचार करतो असे म्हणाले आहेत. रणजित सिंह हा तुमच्याकडून उभा राहण्यास तयार आहे. शरद पवारांनी उमेदवारीबद्दल विचारणा करतोय, अशी माहिती बबनराव शिंदे यांनी दिली.

 

 

तसेच जर शरद पवारांनी तिकीट नाही दिले तर १९९५ सालच्या निवडणुकीसारखी अपक्ष छत्री हे चिन्ह घेऊन निवडणुकीच्या मैदानात मुलाला उतरवू,

 

असा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात अजित पवार गटातील हे दोन आमदार शरद पवार गटातून लढणार की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

 

दरम्यान गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदारकांचा शपथविधी पार पडला. राज्यपाल नियुक्ती आमदार म्हणून 12 पैकी 7 नेत्यांची वर्णी लागली आहे.

 

महाराष्ट्रातील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी दुपारी 12 वाजता विधानभवनातील सेंट्रल हॉलमध्ये पार पडला. या सात जणांमध्ये अजित पवार गटाकडून नेते आणि छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांनी शपथ घेतली.

 

तर शिंदे गटाच्या नेत्या आणि माजी आमदार मनीषा कायंदे यांनी शपथ घेतली. आता यावर अजित पवार गटाच्या पुणे शहराध्यक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे शहराध्यक्षासह तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे.

 

 

अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर हे नाराज झाले आहेत. राज्यपाल नियुक्त कोट्यातून आमदारकी न दिल्याने त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे,

 

त्यांच्यासोबत पुणे शहरातील अजित पवार गटाच्या तब्बल 600 जणांनी राजीनामा दिला आहे. नुकतंच याबद्दल अजित पवार गटाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची घोषणा केली.

 

मी 2012 पासून पक्षाचं काम करतोय. गेले 14 महिने शहर अध्यक्ष म्हणून काम करतोय. राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून संधी मिळावी, अशी मागणी पदाधिकारी यांनी केली होती. पंकज भुजबळ,

 

इद्रिस नाईकवडे यांना संधी दिली. मग मला नाकारण्याचं कारण काय? मला इतर माणसासारखं पुढे पुढे करता येत नाही. कार्यकर्त्यांनी स्वतःहून राजीनामे दिले आहेत.

 

मी स्वतः राजीनामा देतो. कार्यकर्त्यांनी राजीनामा माघारी घ्यावे. सुनील तटकरे यांनी रुपाली चाकणकरांबद्दल तत्परता दाखवली. ती आमच्याबद्दल का दाखवली नाही? असा प्रश्नही दीपक मानकर यांनी उपस्थित केला आहे.

 

 

भुजबळ साहेबांच्या घरात सगळी पद दिली तर इतर कार्यकर्त्यांना संधी कधी देणार. मी शनिवारपर्यंत हा राजीनामा अजित पवारांकडे देणार आहे.

 

दीपक मानकरांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी मागणी पुणे शहरातील कार्यकर्त्यांनी केली होती. अजित पवारांच्या हातात हे सगळं असून पंकज भुजबळ यांना संधी दिली पण मला मात्र डावलले? अशा शब्दात त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

 

 

महायुतीला याचा फटका कुठल्या कुठे बसेल सांगता येत नाही. पक्षांमध्ये एकतर्फी प्रेम करून चालत नाही नेत्याचं पण प्रेम असणे गरजेचे आहे. रुपाली चाकणकर

 

आणि मला महानगरपालिकेचे तिकीट द्या, मग कोणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळेल. सत्तेचे विकेंद्रीकरण होणं गरजेचं आहे. सुनील तटकरे अध्यक्ष आहेत.

 

आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत. मला इतर पक्षातून ऑफर येत आहेत. पण मी अजित पवारांसोबत राहणार. आम्ही महायुतीचे काम करणार.

 

पण जर मला संधी द्यायची नव्हती तर मग मला सांगायला हवं होतं. आम्ही जर ठरवलं तर निवडणुकीत याचा फटका पक्षाला बसेल, असेही दीपक मानकर यांनी म्हटले.

 

 

तुमच्या कार्यकर्तीला तुम्ही ताकद देता. तसे आम्हाला देता येत नाही का? त्या 24 तास तुमच्या बरोबर असतात म्हणून त्यांचीच बाजू घेणार का?

 

पंकज भुजबळ यांचे मेरीट काय? आम्ही काय हमाल्या करायला बसलोय का इकडे? असे संतप्त सवाल दीपक मानकर यांनी केले.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *