मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करायचा निर्णय झाला होता,पण…… .
It was decided to include Marathas in OBC, but...... .

मी मराठा आरक्षणामध्ये घातलेला खुट्टा मनोज जरांगेंना उपटताच आला नाही, माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळालं नसल्याचं वक्तव्य साहित्यिक रावसाहेब कसबे यांनी केलं.
मी मराठ्यांना विरोध केल्यानेच ओबीसींनी मराठ्यांना एकमताने विरोध केल्याचंही ते म्हणाले. नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यावेळी राज्याचे मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.
रावसाहेब कसबे म्हणाले की, 2010 सालीही माझ्यामुळेच मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण मिळालं नाही. आता जरांगेंची दुसरी मोहीम सुरू झाली.
जरांगे याने पहिल्याच भाषणात बोलताना म्हणाला होता की कसबेंनी घातलेला खुंटा मी उपटणार, पण जरांगेने काय केलं?
2010 च्या दशकात ज्या वेळी ओबीसी आरक्षण पूर्ण धोक्यात आलं होतं, मराठे ओबीसी मध्ये जाणार होते. 2010 ला सेटिंग झाली होती, बहुमत झाले होते.
छगन भुजबळांना हे सगळं माहीत आहे. मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश होणार हे ठरलं होतं. त्यावेळी मी त्याला कडाडून विरोध केला.
त्यावेळी त्यानंतर एकमताने आम्ही मराठ्याना बाहेर काढलं. त्यानंतर जरागेची दुसरी मोहीम सुरू झाली. त्याच्या पहिल्याच भाषणात म्हणाला होता की, मराठा आरक्षणामध्ये रावसाहेब कसबेंनी घातलेला खुट्टा तो उपटणार. पण जरांगने काय केलं?