महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत गुजरात, मध्य प्रदेशच्या भाजप नेत्यांची ‘फौज

'Army' of BJP leaders from Gujarat, Madhya Pradesh in Maharashtra assembly elections

 

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती मिळून राज्यात १७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवतानाच उत्तर महाराष्ट्रात ४७ पैकी ४० प्लस जागा जिंकण्याचे उद्दिष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य नेतृत्वाला दिले आहे.

 

राज्यात सत्ता हवी असेल तर गटबाजी नको असे सांगत, नेते नव्हे, तर पक्षच सर्वश्रेष्ठ असल्याचा संदेश देतानाच निवडणूक उमेदवार नव्हे तर पक्ष लढत असतो.

 

त्यामुळे जिथे आपला उमेदवार नसेल तेथेही पक्षाचे काम करा, असा सल्ला शहा यांनी कोअर कमिटीच्या सदस्यांना बंददाराआड दिला.

 

उत्तर महाराष्ट्रातील ४७ मतदारसंघांमध्ये विजयाची जबाबदारी ही गुजरात आणि मध्य प्रदेशातील खासदार, तसेच आमदारांवर टाकण्यात आली असल्याने महाविकास आघाडीसमोर कडवे आव्हान राहणार आहे.

 

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयाचा वारू महाराष्ट्राने रोखला असून, महायुतीला मोठा फटका बसला आहे. राज्यात महायुतीला ४८ पैकी १७ जागांवर,

 

तर भाजपला नऊ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळे आगामी विधानसभेतही हाच ‘पॅटर्न’ राहण्याचा धसका भाजपच्या नेतृत्वाने घेतला आहे,

 

तर महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीतही लोकसभेचा ‘पॅटर्न’ अवलंबत धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजपचे पानिपत होऊ नये

 

यासाठी अमित शहा यांनी राज्यातील भाजपची धुरा हाती घेतली असून, महायुतीच्या विजयासाठी सूक्ष्म नियोजन सुरू केले आहे.

 

त्याचाच भाग म्हणून नागपूर, छत्रपती संभाजीनगर यापाठोपाठ शहा यांनी बुधवारी नाशिकमध्ये येऊन उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला.

पदाधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर शहा यांनी उत्तर महाराष्टातील निवडक ३० जणांसोबत बंद दाराआड चर्चा केली. यावेळी शहा यांनी विधानसभा निवडणुकांसाठी

 

आवश्यक असलेली त्रिसूत्रीच निवडक पदाधिकाऱ्यांच्या हाती दिल्याचे समजते. निवडणूक महायुती म्हणूनच लढायची आहे, मित्रपक्षाचेही उमेदवार निवडून आले पाहिजेत,

 

पाडापाडीचे राजकारण करायचे नाही. कुठेही गटबाजी खपवून घेतली जाणार नसल्याचा संदेश देतानाच चिंता करू नका राज्यात महायुतीचीच सत्ता येईल,

 

असे आश्वासनही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. उत्तर महाराष्ट्रात विधानसभेच्या ४७ जागा असून, त्यापैकी ३४ जागा महायुतीकडे आहेत.

 

त्यामुळे यात आणखी आठ जागांची भर घालून ‘४० प्लस’ जागा जिंकण्यासाठी शहा यांनी नवीन कार्यकर्ते जोडा, योजना लोकांपर्यंत पोहोचवा,

 

विरोधकांचा ‘फेक नॅरेटिव्ह’ खोडून काढा, असा विजयाचा मंत्रही दिला. महायुती म्हणून कसे निवडणुकांना सामोरे जायचे याचाही कानमंत्र शहा यांनी बंददाराआड दिला.

 

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील ४७ विधानसभा आणि आठ लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी ही गुजरात आणि मध्य प्रदेशातील खासदारांवर सोपविण्यात आली आहे.

 

एका खासदाराकडे दोन लोकसभा मतदारसंघ देण्यात आले असून, गुजरात आणि मध्य प्रदेशातील प्रत्येक आमदाराकडे उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येकी एका मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

 

या सर्वांचे रिपोर्टिंग हे थेट अमित शहा आणि सहसंघटनमंत्री शिवप्रकाश यांना असेल. पुढील तीन दिवस ते प्रत्येक मतदारसंघांमध्ये जाऊन बैठका घेणार आहेत.

 

…अशी आहे उत्तर महाराष्ट्राची स्थिती
एकूण जागा- ४७
भाजप- १६
शिंदे गट- ८
अजित पवार गट- १०
महायुती- ३४ जागा

 

 

नाशिक दौऱ्यावर आलेल्या शहा यांनी दुपारी हॉटेलचे जेवण घेण्याऐवजी भाजप कार्यकर्त्याच्या घराच्या सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला.

 

शहर उपाध्यक्ष नीलेश बोरा यांच्या घरून शहा यांच्यासाठी मराठमोळे जेवण मागविण्यात आले होते. त्यात डाळ-भात, उसळ,

 

भेंडीची भाजी, कोबी आणि वाटाणा, चपाती, पातोड्या, पापड, बुंदी-रायता, सलाड अशा पदार्थांचा समावेश होते. शहा यांनी या घरगुती रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *