महाराष्ट्रातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ ;पहा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम
Graduate and Teacher Constituencies in Maharashtra; View Full Election Schedule

राज्यात लोकसभा निवडणुकींची धामधूम सुरू असताना आता आणखी एका निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक जाहीर झाल्या आहेत.
राज्यात चार जागांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर झाली आहे. या चार आमदारांचा कार्यकाळ 7 जुलैला संपणार आहे. त्यामुळे मुंबई, नाशिक व कोकण विभागामध्ये 10 जूनला मतदान होईल.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर केली आहे. मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर,
नाशिक विभाग शिक्षक तसेच मुंबई शिक्षक मतदारसंघ अशा 4 जागांकरिता निवडणूक होत असून यासाठी सोमवार, 10 जून 2024 रोजी मतदान होणार आहे.
विलास विनायक पोतनीस (मुंबई पदवीधर मतदारसंघ), निरंजन वसंत डावखरे (कोकण पदवीधर मतदारसंघ), किशोर भिकाजी दराडे (नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघ) आणि कपिल हरिश्चंद्र पाटील (मुंबई शिक्षक मतदारसंघ)
हे दिनांक 7 जुलै 2024 रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेतून निवृत्त होत आहेत. त्यामुळे आयोगाने 2 शिक्षक मतदारसंघ आणि 2 पदवीधर मतदारसंघाकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
या निवडणुकीसाठी बुधवार, 15 मे 2024 रोजी अधिसूचना जारी केली जाईल. या निवडणुकीकरिता बुधवार, 22 मे 2024 पर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येईल.
उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जांची छाननी शुक्रवार, 24 मे 2024 रोजी केली जाईल तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत सोमवार, 27 मे 2024 अशी आहे.
सोमवार, 10 जून 2024 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत या चारही मतदारसंघाकरिता मतदान होईल. गुरूवार, 13 जून 2024 रोजी मतमोजणी होईल.
ही संपूर्ण प्रक्रिया दिनांक 18 जून 2024 रोजी पूर्ण होईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.