महाराष्ट्रातील ‘या’ भागात २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट
Orange alert for 24 hours in 'this' area of Maharashtra


नैऋत्य मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्याने राज्यात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित भागात पावसाने जोर धरला आहे.
पुढील पाच दिवस पावसाची हीच स्थिती कायम राहणार असून, त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मान्सून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या काही भागांमध्येही दाखल झाला आहे. तसेच उर्वरित अरबी समुद्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल हवामान तयार झाले आहे.
शरद पवारांचे सूचक विधान,स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक महाविकास आघाडी फुटणार?
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी काही ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी, तर एखाद्या भागात तीव्र अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
21 जूनला पावसाचा जोर थोडा कमी होण्याची शक्यता असून, मध्यम पाऊस कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही दोन्ही दिवस पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यावर न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
पाहा दोन दिवस कोण कोणत्या जिल्ह्यात पाऊस
21 जूनला पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांत आज 20 जून रोजी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस होईल. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 20 जून रोजी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि हलका ते मध्यम पाऊस होईल.
पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या मंत्र्याची अघोरी पूजा;महाराष्ट्रात खळबळ
महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसामुळे सुमारे १० जणांचा मृत्यू झाला आहे. बहुतेक मृत्यू वीज पडल्याने झाले आहेत. मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतेक भागात सतत पाऊस पडत आहे.
Corona Breaking News;कोरोनाची साथ ;रूग्णालयांना अलर्ट राहण्याचे आदेश
अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याने रत्नागिरी आणि रायगड सारख्या किनारी जिल्ह्यांसाठी ‘रेड अलर्ट’ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
देशातील SBI च्या ग्राहकांना मोठा धक्का;एक निर्णयाचा कोट्यवधी लोकांना फटका
याचदरम्यान कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र (आय.एन.सी.ओ.आय.एस.) मार्फत उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
पालकमंत्री पदासाठी शिंदेंच्या मंत्र्याची अघोरी पूजा;महाराष्ट्रात खळबळ
राज्यात मागील २४ तासांमध्ये (२० जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) रत्नागिरी जिल्ह्यात ४१.७ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ४१.६ मिमी, पालघर ४१.६ मिमी, रायगड जिल्ह्यात ४०.१ मिमी आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात ३१.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.
157 प्रवासी घेऊन जाणाऱ्या इंडिगो विमानाचे नागपूरमध्ये इमर्जन्सी लॅण्डिंग
राज्यात कालपासून आज २० जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे ४१.६, रायगड ४०.१, रत्नागिरी ४१.७, सिंधुदुर्ग २४.२, पालघर ४१.६, नाशिक २७.४, धुळे १.५, नंदुरबार ४, जळगाव ३.४, अहिल्यानगर ८.४, पुणे २८, सोलापूर २,
सातारा २६.५, सांगली ५.४, कोल्हापूर १७.४, छत्रपती संभाजीनगर ७.२, जालना ५.५, बीड ४.८, लातूर ०.६, धाराशिव ३.३, नांदेड ३.७, परभणी ३, हिंगोली ७.८, बुलढाणा ६.५, अकोला ११.६, वाशिम ७.६ अमरावती १२, यवतमाळ ९.७, वर्धा १०.७, नागपूर ५.९, भंडारा ३.२, गोंदिया ३.९, चंद्रपूर २.६ आणि गडचिरोली जिल्ह्यात १.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
नाशिक जिल्ह्यात पाण्यात बुडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तर जालना जिल्ह्यात वीज पडून एका प्राण्याचा मृत्यू झाला आहे.
शरद पवारांचे सूचक विधान,स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक महाविकास आघाडी फुटणार?
राज्य आपत्कालीन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे खडकवासला धरण मुठा नदी १५,०९२ क्यूसेक, बंडगार्डन बंधारा पुणे-२४,४१६ क्युसेक, भिमा नदी दौंड पूल विसर्ग १०,८३३ क्युसेक,
घोड नदी घोड धरण ४,००० क्युसेक, कण्हेर धरण सातारा ५०० क्युसेक, वेण्णा नदी-१,००० क्युसेक विसर्ग सुरू असून नदी किनाऱ्या लागत गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील गोदावरी नदी नांदूर मधमेश्वर धरणातून २२,३४५ क्युसेक, सीना नदी – सीना धरणातून २८९ क्युसेक विसर्ग सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेड, दापोली नगरपालिका हद्दीमध्ये पुराचे पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. बोरघर वावे तर्फे नातू चिंचवली या रस्त्यावरच्या पुलावर पाणी गेल्याने रस्ता बंद होता.
वनोशी अंगणवाडी पन्हाळे फणसूर रस्त्याच्या मधील पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे. चिंचगर कोरेगाव भैरवी रोड मधील रस्त्यावर पुलावर पुराचे पाणी आल्याने रस्ता बंद करण्यात आला होता. सद्यस्थित वाहतूक सुरळीत चालू आहे.
शरद पवारांचे सूचक विधान,स्थानिक स्वराज्य संस्थां निवडणूक महाविकास आघाडी फुटणार?
राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ (गुहागर- चिपळूण-विजापूर) सोनपात्र वळणाजवळ दरड कोसळयाने काही काळ वाहतूक बंद करून दरड बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे चिपळूण, दापोली येथे झाड कोसळून आणि भिंत पडून खासगी मालमत्तांचे नुकसान झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने कळविले आहे.