महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा “या “शहरात शाळांना सुट्ट्या जाहीर

Warning of heavy rains in Maharashtra, holidays have been declared for schools in the city

 

 

 

नागपुरात कालपासून कोसळत असलेल्या पावसामुळे सकल भागातील नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने आज २० जुलै रोजी शनिवारी उशिरा शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

 

त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त केलाय. मुसळधार पावसामुळे विमानसेवेवरही परिणाम झालेला आहे. नागपुरात गेल्या तीन तासात सरासरी 90 मिलिमीटर पाऊस झाला असून तीन तास जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

 

सिमेंट रस्त्याच्या कामामुळे नागपुरात आज जागोजागी घरांमध्ये पाणी शिरण्याच्या तक्रारी समोर आलेल्या आहे. पहाटेपासून सुरू झालेल्या पावसात हवामान खात्याने

 

 

तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतरही मुले शाळेत गेल्यानंतर सुट्टी दिल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाद्वारेव्हिडिओ,फोटो व्हायरल झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने आज शाळांना सुट्टी जाहीर केली.

 

तसेच 18, 19, 20 आणि 21 जुलै रोजी नागपूर विभागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान विभागाने पुढील तीन तास भंडारा,

 

चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यांना विजेच्या कडकडाटा सह अती मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.

 

 

नागपुरात 91.3 मिलिमीटर पाऊस झाला असून 20 जुलै च्या पहाटे साडेपाच ते सकाळी साडेआठ या तीन तासात 81.8 मिमी पाऊस झाल्याची हवामान खात्याने माहिती दिलेली आहे.

 

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *