महाराष्ट्र निवडणुकीची तारीख जाहीर,निकाल ‘या’ तारखेला

Maharashtra election date announced, result on 'this' date

 

 

 

आज आम्ही महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करत आहोत. महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार आहेत, त्यापैकी ४.९८ कोटी पुरुष मतदार आहेत तर ४.६६ कोटी महिला मतदार आहेत. अशी माहितीही राजीव कुमार यांनी दिली.

 

आम्ही काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यादरम्यान आम्ही निवडणुकीची तयारी योग्य प्रकारे झाली आहे की नाही? याची माहिती आम्ही घेतली.

 

लोकसभा निवडणुकीच्या वेळी काही गोष्टी घडल्या होत्या त्या टाळण्यासाठी आम्ही आता पूर्णपणे प्रयत्न करत आहोत. लोकांची मतदानासाठी रांग लागते त्यावेळी काही अंतरावर खुर्ची किंवा बाक रचण्याचा सल्ला आम्ही दिला आहे.

 

८५ वर्षे आणि त्यावरच्या मतदारांना घरुन मतदान करता येणार आहे. तसंच या मतदारांच्या गोपनीयतेची काळजी आम्ही घेऊ त्यासंदर्भातली पूर्ण व्यवस्था आम्ही केली आहे असंही राजीव कुमार यांनी स्पष्ट केलं.

 

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना त्यांची पार्श्वभूमी तीनवेळा वृत्तपत्रात द्यावी लागेल. आम्ही जेव्हा महाराष्ट्रात बैठका घेतल्या तेव्हा आम्ही त्यासंदर्भातले कठोर निर्देश आम्ही राज्य निवडणूक आयोग

 

आणि इतर अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. असंही राजीव कुमार यांनी सांगितलं आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव आहे. त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक आहे.

 

महाराष्ट्रात एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहे. २० नोव्हेंबरला एका टप्प्यात निवडणूक घेतली जाणार आहेत. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

 

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी ही माहिती दिली आहे. गॅझेट नोटिफिकेशनची तारीख २२ ऑक्टोबर असेल तर २९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल.

 

३० ऑक्टोबरला अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ अशी असणार आहे. २० नोव्हेंबरला महाराष्ट्राची निवडणूक एका टप्प्यात होईल. तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागेल.

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची तारीख आणि निकाल या दोन्हीची तारीख जाहीर झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज ही घोषणा केली.

 

 

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात निवडणूक कधी जाहीर होणार? याच्या चर्चा रंगल्या होत्या. काही दिवसांपूर्वी राजीव कुमार यांनी

 

पत्रकार परिषद घेतल २६ नोव्हेंबरच्या आधी निवडणूक घेतली जाईल असं म्हटलं होतं. आज अखेर या निवडणुकीची आणि निकालाच्या दिवसाची घोषणा झाली आहे.

 

 

निवडणुकीचं नोटिफिकेशन : 22 ऑक्टोबर 2024
अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान : 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024

 

 

288 जागांसाठी किती मतदार असतील?
एकूण मतदार – 9 कोटी 63 लाख
नव मतदार – 20.93 लाख
पुरूष मतदार – 4.97 कोटी
महिला मतदार – 4.66 कोटी
युवा मतदार – 1.85 कोटी

 

तृतीयपंथी मतदार – 56 हजारांहून जास्त
85 वर्षावरील मतदार – 12. 48 लाख
शंभरी ओलांडलेले मतदार – 49 हजारांहून जास्त
दिव्यांग मतदार – 6.32 लाख

 

 

महाराष्ट्रात किती मतदान केंद्र असणार?
एकूण मतदान केंद्र – 1 लाख 186
शहरी मतदार केंद्र – 42,604
ग्रामीन मतदार केंद्र – 57,582

 

महिला अधिकाऱ्यांची केंद्रे –
एका मतदान केंद्रावर सरासरी मतदार – 960
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांच्या तारीखा जाहीर करण्यात आल्या. महाराष्ट्रात एकूण 9.63 कोटी मतदार असून त्यासाठी 1 लाख 186 मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. मतदानाची पूर्ण प्रक्रिया ही व्हिडीओ रेकॉर्ड होणार आहे.

 

 

 

मतदारांसाठी सुविधा पोर्टल ॲप
निवडणूक आयोगाच्यावतीने सुविधा पोर्टल नावाने ॲप जारी करण्यात आलं आहे. या एप्लिकेशन्सवर मतदारांना तक्रार करता येणार आहे. एखाद्या ठिकाणी काही घटना घडली किंवा उशीरापर्यंत मतदान सुरु असेल तर केवळ फोटो काढून या एप्लिकेशन्सवर अपलोड केला की, 90 मिनिटांत निवडणूक आयोगाची टीम तिथं पोहचेल असे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *