मोदींचा पंतप्रधान पदाचा शपथविधी 9 जूनला
Modi's swearing in as Prime Minister on June 9

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. येत्या रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा राजधानी दिल्लीत पार पडेल.
एनडीएच्या संसदीय दलाची बैठक आज संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये झाली. यावेळी जे राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अमित शाह
नितीन गडकरी, एचडी कुमारस्वामी, चंद्राबाबू नायडू यांनी अनुमोदन दिले. हा १४० कोटी जनतेच्या मनातील प्रस्ताव असल्याच्या भावना शाहांनी व्यक्त केल्या. त्यानंतर संसदीय पक्षाच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाली.
सेंट्रल हॉलमध्ये प्रवेश करताच नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष भाजपसह एनडीएच्या खासदारांनी केला. आधी मोदींनी संविधानाला नमन केलं. तर पुढे जात सत्तास्थापनेतील महत्त्वाचे घटक असलेल्या चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी हस्तांदोलन केलं.
एनडीएच्या संसदीय दलाच्या बैठकीला संबोधित करत मोदी सरकारचा रोडमॅप मांडणार आहेत. येत्या रविवारी ९ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं असलं, तरी भाजपला एकट्याला स्वबळावर बहुमत गाठण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे मित्रपक्षांची साथ अशा परिस्थितीत महत्त्वाची ठरत आहे.
२०२४च्या सुरुवातीला भाजपमधून ‘एनडीए चारसो पार’चा नारा दिला गेला. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत, एकटा भाजप ३७० अशी दुरुस्ती करताना याचीच पुष्टी केली.
त्यानंतरच्या चारच महिन्यांत भारतीय मतदाराने आपले असे शक्तिप्रदर्शन केले की, घटकपक्षांच्या आधाराशिवाय भाजप बहुमत गाठत नसल्याचे लोकसभा निवडणुकांचे निकाल लागत असताना स्पष्ट झाले.
भाजपला मिळालेल्या धक्क्यामागे आणखी एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे राज्यघटना बदलाचा. साडेतीनशेचे एनडीए बळ असलेल्या मोदींना लोकसभेत यंदा ‘चारसो पार’ असे पाशवी बहुमत का हवे आहे,
तर ते राज्यघटना बदलण्यासाठी हा काँग्रेसचा प्रचारबाण अगदी अचूक लागला. देशभरातील दलितांमध्ये हा संदेश खोलवर गेला व या वर्गात अत्यंत अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले.
उत्तर प्रदेशात मायावतींचा दलित मतदार भाजपची साथ सोडून गेला त्याचे हेच एक ठळक कारण मानले जाते.