“या” पक्षाने केला विधानसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार जाहीर

This party announced its first candidate for the assembly elections

 

 

आमचे दहा जरी आमदार निवडून आले तर आम्ही गणपती बसविल्याशिवाय राहणार नाही, असा टोला लगावत महाराष्ट्रात भावी मुख्यमंत्री तिसऱ्या आघाडीशिवाय ठरणार नसल्याचे संकेत आमदार बच्चू कडूंनीही यांनी दिले आहे.

 

याचवेळी उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर सडकून टीका करत बच्चू कडू यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

 

विशेष म्हणजे वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे प्रहार पक्षाच्या सभेत राज्यातील प्रहरचा पहिला उमेदवारही बच्चू कडू यांनी स्टेजवरून घोषीत केला आहे.

 

बीआरएस मधून प्रहारमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार बेळखडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेवर प्रहारचा उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे.

 

लोकसभा निवडणुकीनंतर आता साऱ्यांना विधानसभा निवडणुकीचे  वेध लागले आहे. त्याच पार्श्वभूमीवर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे.

 

दरम्यान, राज्यात आणखी एका आघाडीची शक्यता वर्तवली जात असताना महाराष्ट्रात प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू , स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे ,

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी निर्माण केलेल्या तिसऱ्या आघाडीकडून नेमक्या किती जागा लढविल्या जातात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

त्यात आता वर्ध्यातील चारही विधानसभा मतदारसंघात तिसऱ्या आघाडीच्या महाशक्तीने लढण्याची तयारी सुरु केल्याचे दिसून आले आहे.

 

तर त्यातच आज वर्ध्याच्या कारंजा घाडगे येथे प्रहार पक्षाच्या सभेत राज्यातील प्रहरचा पहिला उमेदवारही बच्चू कडू यांनी स्टेजवरून घोषीत केला आहे.

 

बीआरएस मधून प्रहारमध्ये प्रवेश केलेल्या जयकुमार बेळखडे यांच्या नावाची आर्वी विधानसभेवर प्रहारचा उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले आहे.

 

सोबतच देवळी, हिंगणघाट आणि वर्धा या चारही विधानसभा क्षेत्रात तिसऱ्या आघाडीकडून उमेदवार रिंगणात उतरविले जाणार असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.

 

महायुतीमध्ये असलेली इच्छुक उमेदवारांची गर्दी आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न देखील तिसऱ्या आघाडीकडून केला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

 

दरम्यान, काल (शनिवारी)संजय राऊत यांनी टीका करताना म्हणाले होते की, तिसरी आघाडी म्हणजे पैसे खाणारी आघाडी आहे. यावर बोलताना ही बच्चू कडू यांनी निशाणा साधाला आहे.

 

यावेळी ते म्हणाले की, संजय राऊत आणि जयंत पाटील यांना मला सांगयाचे आहे की, जेव्हा शरद पवार काँग्रेस मधून फुटले तेव्हा राष्ट्रवादी तिसरी होती,

 

हे विसरु नका. जेव्हा भाजप आणि काँग्रेस लढत होती तेव्हा शिवसेना तिसरी होती. दिल्ली मध्ये केजरीवाल निवडून आले त्यावेळी तेही तिसरेच होते.

 

ममता बॅनर्जी देखील या तिसऱ्याच होत्या. त्यामुळे अब हमारा राज आयेगा, ओ भी तिसरा ही होगा, असे म्हणत बच्चू कडू यांनी निर्धार केला आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *