युद्धविरामची घोषणा होताच सोने – चांदीचे दर गडगडले
Gold and silver prices plummeted as soon as the ceasefire was announced


अमेरिकेनं इराणवर बॉम्ब हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल अमेरिकेचं एअरबेस असलेल्या कतारमध्ये हल्ला केला. त्यानंतर जगभरात टेन्शन वाढलं आहे.
इस्रायल-इराण युद्ध;इराण वरचढ ,भारताला मोठी झळ बसणार
इराण आणि इस्रायल यांच्यात 12 दिवस सलग संघर्ष सुरू होता. त्यानंतर अमेरिकेनं युद्धविरामाची घोषणा केली. या संघर्षात आधीच शेअर मार्केटची वाट लागली होती. शेअर्स मोठ्या अंकांनी कोसळले होते. त्यात पहिल्यांदाच सोन्या चांदीचे दर गडगडले आहेत. दीड ते दोन हजार रुपयांनी
हॉट एअर बलूनला आग; 8 जणांचा होरपळून मृत्यू ;पाहा VIDEO मृत्यूचा थरार
भारतात सोन्याच्या दरात 24 जून रोजी मोठी घसरण पाहायला मिळाली. ज्यांनी मार्केटपेक्षा सोनं सुरक्षित म्हणून तिथे गुंतवणूक केली होती त्या गुंतवणूकदारांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
मुंबईमध्ये सोनं 91 हजार 550 रुपये प्रति तोळावर आलं आहे. 99 हजार रुपये तोळा सोनं पोहोचलं होतं, ते आता 91 हजार रुपये प्रति तोळावर आलं आहे.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजा-वादळांसह पावसाचा अंदाज
22 कॅरेट सोन्याचे दर 91 हजार 550 रुपयांवर तर 24 कॅरेट सोन्याचे दर 96 हजार 652 रुपयांवर पोहोचले आहेत. जवळपास सोनं दीड ते २ हजार रुपयांनी मागच्या काही तासात घसरलं आहे.
चांदीचा दरही लक्षणीयरीत्या घसरत एक किलोसाठी 1 लाख 4 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. MCX वर सोनं 1 लाख रुपयांच्या खाली तर चांदी देखील 1 लाख ५ हजार रुपयांपर्यंत खाली आली आहे.
STमहामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याची योजना ?
GST सह विचार करायचा झाला तर चांदीचे दर 1 लाख 8 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. तर सोन्याचे दर GST सह 1 लाख रुपयांवर पोहोचले आहेत.
तुम्ही दागिने खरेदी करणार असाल तर त्यावर सर्व्हिस चार्ज आणि मजुरी देखील लावली जाते त्यामुळे हे दर आणखी वाढण्याची शक्यता असते.
राज्यात आणखीन एक IAS अधिकारी गोत्यात
तज्ज्ञांच्या मते, इराण-इस्रायल संघर्ष शमल्यामुळे अस्थिरता काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, येत्या काही आठवड्यांत किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.
जागतिक चलन बाजारातील घडामोडी, डॉलरच्या विनिमय दरात होणारे बदल, महागाई आणि व्याजदर यांचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होतो. भारतीय घरांमध्ये सोनं ही केवळ सजावटीची वस्तू नाही,
राज्यात हिंदी सक्तीचा मुद्दा तापला;सरकार अडचणीत,कवींकडून पुरस्कार वापसी
तर एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. लग्नसराई, सणवार यामध्ये सोन्याची खरेदी शुभ मानली जाते. त्यामुळे किंमती घसरल्या तरी दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी गडबड करण्याचे कारण नाही, असं तज्ज्ञांचे मत आहे.