राज्यातील शाळांना तीन दिवस सुटी?
Three days holiday for schools in the state?

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या अनुषंगाने १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे शाळा भरवणे
शक्य नसल्यास शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यासंदर्भात आवश्यक त्या सूचना देण्याचे निर्देश शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना दिले आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेतील कामकाज आणि प्रत्यक्ष मतदानाच्या प्रक्रियेत शिक्षकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
तसेच अनेक मतदान केंद्रेही शाळांमध्ये असतात. मतदानासाठीची तयारी करण्यासाठी निवडणूक प्रशासन शाळा ताब्यात घेते. या पार्श्वभूमीवर १८, १९ आणि २० नोव्हेंबर रोजी शाळांना सुटी देण्याचा प्रस्ताव
शिक्षण आयुक्तालयाने शिक्षण विभागाला सादर केला होता. या अनुषंगाने शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन यांनी परिपत्रकाद्वारे शिक्षण आयुक्तांना निर्देश दिले आहेत.
राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२०४ सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल,
त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबत आयुक्त स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, असे नमूद करण्यात आले आहे.
शाळांतील बहुसंख्य शिक्षकांना निवडणुकीच्या काम करावे लागत असल्याने शाळेत शैक्षणिक कामकाज होऊ शकत नाही. तसेच काही ठिकाणी शाळांमध्ये मतदान केंद्र असते.
त्यामुळे त्या ठिकाणीही पूर्वतयारी करावी लागते. ही बाब लक्षात घेता शाळा बंद ठेवाव्या लागू शकतात. त्यामुळे शाळांना सुटी देण्याचा निर्णय योग्य ठरतो.
या संदर्भात शाळा व्यवस्थापन आणि स्थानिक प्रशासन यांनी स्थानिक परिस्थितीनुसार निर्णय घेणे उचित ठरेल. मात्र, सरसकट सुटी देणेही योग्य ठरणार नाही, असे माजी मुख्याध्यापक महेंद्र गणपुले यांनी सांगितले
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात आजपासून 85 वर्षांपुढील वृद्धांच्या मतदानाला आणि पोस्टल मतदानाला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे शाळेतील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं असून त्यांनाही मतदान दिवशीची जबाबदारी बजावण्यात आली आहे.
त्यामुळेच, शिक्षक संघटनांकडून मतदानाच्या दोन दिवस अगोदर शाळांना सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली जात होती. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातली शाळांना 18 ते 20 अशी तीन दिवस सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या कामात मोठ्या संख्येने शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्यामुळे अनेक शाळांना शाळा चालविणे
18 19 आणि 20 नोव्हेंबरला अशक्य असल्याने ज्या शाळांना शाळा भरवणे कठीण आहे, त्या शाळांना सुट्टी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे, 18, 19,20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीत शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल त्या ठिकाणी
संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना शाळा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्याबाबत सूचना देण्याच्या राज्य सरकारच्यावतीने शिक्षण आयुक्तांना विनंती पत्राद्वारे देण्यात आलं आहे.
निवडणूक कर्तव्यावर अनेक शिक्षक असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शाळा या तीन दिवस भरवणे कठीण जात आहे.
याशिवाय अनेक शाळांमध्ये मतदान केंद्र सुद्धा ठरवण्यात देण्यात आले. या सगळ्याचा विचार करून 18, 19 आणि 20 नोव्हेंबर या तीन दिवशी ज्या शाळांना शाळा भरवणे शक्य नसेल त्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने दिनांक18,19 व 20 नोव्हेंबर, 2024 रोजी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचा प्रस्ताव आपण शासन मान्यतेसाठी सादर केला आहे.
सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 राज्यात सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यामुळे ज्या ठिकाणी शाळा भरवणे शक्य नसेल,
त्या ठिकाणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय घेणेबाबत आपण आपल्यास्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात, ही विनंती, असे आदेश राज्य सरकारचे उपसचिव तुषार महाजन यांच्या पत्राद्वारे शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहेत.