राज्यात आणखीन एक IAS अधिकारी गोत्यात
Another IAS officer in the state has been arrested.


पूजा खेडकरपाठोपाठ बनावट प्रमाणपत्र प्रकरणात आता राज्यातील आणखी एक आयएएस अधिकारी अडचणीत आला आहे. धाराशिवचे तत्कालीन जिल्हाधिकारी आणि सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे यांच्या ओबीसी नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची चौकशी होणार आहे.
पत्रकारांच्या “त्या” प्रश्नावर अजितदादांचा काढता पाय
केंद्र सरकराने राज्याच्या मुख्य सचिवांना चौकशीचे आदेश दिले आहेत…सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्या तक्रारीची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत.
पूजा खेडकर प्रकरणानंतर आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. आणखी एक आयएएस अधिकारी अडचणीत आला आहे. O B C आरक्षणासाठी खोटं N C L प्रमाणपत्र सादर करुन सरकारी यंत्रणेला फसवणूक करूनआयएएसची खुर्ची मिळवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
इस्रायल-इराण-अमेरिका युद्धामुळे भारतात काय काय महागणार ?
केंद्र सरकारनं तपासाचे आदेश दिले आहेत. पूजा खेडकर प्रकरण थंड होत नाही, तोच महाराष्ट्रातून आणखी एका आयएएस अधिकाऱ्याचा बोगस प्रमाणपत्र घोटाळा उघड आल्याने सरकारी यंत्रणेत खळबळ उडाली आहे. यामुळे सोलापूरचे आयुक्त सचिन छगनलाल ओंबसे अडचणीत सापडलेत आहेत.
BC, N C L प्रमाणपत्रासाठी खोटी माहिती कागदपत्रं सादर केल्याचा आरोप आहे. सचिन ओंबसे यांचे वडील दहिवडीच्या महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. त्यांचा पगार वार्षिक 12 लाखांच्या घरात आहे.
पुढील दोन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पाऊस, विजा-वादळांसह पावसाचा अंदाज
तरीदेखील N C L मिळकतीच्या अटींपेक्षा कमी उत्पन्न असल्याचे खोटे दाखवून ओबीसी आरक्षणाचा फायदा घेतला आणि बेकायदेशीरपणे पाचव्या प्रयत्नात U P S C परीक्षा देऊन I A S झाले असा आरोप आहे.
STमहामंडळाकडून उत्पन्न वाढविण्यासाठी प्रवाशांना तिकीटदरात सवलत देण्याची योजना ?
पहिले चारही प्रयत्न त्यांनी Open General मध्ये दिले. पण IAS पद न मिळाल्याने यंत्रणेला फसवून OBC NCL प्रमाणपत्र मिळवलं आणि पाचव्या प्रयत्नात I A S झाले. नियमानुसार O B C साठी उत्पन्न मर्यादा 4.5 लाख होती. पण ओंबसे कुटुंबाचं उत्पन्न त्याहून तिप्पट आहे.
केंद्र सरकारच्या D O P T विभागानं आता महाराष्ट्र सरकारला चौकशीचे आदेश दिलेत. ओंबसे यांचं NCL प्रमाणपत्र पुन्हा तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना या आदेशता देण्यात आल्या आहेत.
तिसरं महायुद्ध जवळ? इराणने केली जगाची कोंडी, स्ट्रेट ऑफ होर्मूजचे महत्त्व काय?
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी ही तक्रार केली होती. प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे नोकरी रद्द करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे चौकशीचा फास ओंबसे यांच्या गळ्यात चौकशीचा फास आवळला आहे.