राष्ट्रीय संत सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांचा जिल्हाचिकीत्सक नांदेड च्या वतीने गौरव….!

National saint Sadguru Sainath Maharaj Vasmatkar is honored on behalf of District Medical Officer Nanded....!

 

 

 

 

मंगळवार 13 ऑगस्ट रोजी डॉ.एन. आय.भोसीकर जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय नांदेड यांच्याहस्ते राष्ट्रसंत सद्गुरू साईनाथ महाराज वसमतकर यांना सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

श्री.आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूरगड तथा द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांच्या सामाजिक कार्य व पर्यावरण विषयक जागरुकता निर्माण करण्यात मोठा हातभार लागतो आहे

 

या बाबींना अंकीत करून हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.द.भ.प.सद्गुरु साईनाथ महाराज वसमतकर यांनी आजवर जिथे जातील तिथे प्रत्येक ठिकाणी स्वच्छता करुन,

 

राष्ट्रगीताने प्रवचन व कीर्तनाची सुरवात करण्याचा दंडक ठेवला आहे.कोरोना काळात 150 क्विंटल धान्य किट्स चे गरजूंना वाटप,’कोरोना योद्धा’ म्हणून मा.उपजिल्हाधिकारी यांच्याकडून गौरव करण्यात आला असून

 

माहूर,मुदखेड,जिंतूर,सेनगाव व वसमत येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मोफत जेवणाची व्यवस्था आश्रमाकडून केली जाते.

 

माहूर येथील अत्याचार ग्रस्त मुलीला व आजीला अजन्म दत्तक घेऊन संगोपन ते करत आहेत आणि याच कार्याची दखल घेऊन महागाव येथील तहसीलदार यांनी ब्रॅण्ड अम्बेसिटर तथा कोरोना योद्धा म्हणून सन्मानित केले आहे.

 

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गुरुकुंज आश्रम मोजरी ते राषट्रपीता महात्मा गांधी यांचे घर सेवाग्राम पर्यंत सुमारे 500 शिष्यांसमवेत पदयात्रे दरम्यान वेगवेगळ्या गावात ग्रामस्वच्छता अभियान त्यांनी राबविले आहे.

 

ही पदयात्रा 14/04/2019 रोजी काढण्यात आली.तसेच पंचायत समिती माहूर आयोजित शिष्यवृत्ती शिबीरास उपस्थित 150 विद्यार्थी-पालक-मार्गदर्शकांना 10 दिवस दोन वेळची उत्तम जेवणाची व्यवस्था श्री.आनंद दत्त धाम आश्रमाकडून करण्यात आली आहे.

 

इतकेच नाही तर पंचायत समिती माहूर वतीने घेण्यात आलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात 500 लोकांच्या जेवणाची व्यवस्था.

 

तसेच विभागीय शिक्षक साहित्य संमेलन, पंचायत समिती माहूर आयोजित समारंभात 100 साहित्यिकांना इच्छा भोजनाची व्यवस्था सुद्धा आश्रमाकडून केली आहे.

 

माहूर तसेच जिल्ह्य़ातील विविध शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप करत आपले शैक्षणिक योगदान सुद्धा त्यांनी नेहमीच दिले असून

 

दरवर्षी मे महिन्यात विद्यार्थ्यांसाठी शिक्षण परिषदेचे आयोजन व मार्गदर्शन वर्ग संपूर्ण व्यवस्था आश्रमाकडून केली जाते. माहूर शहरात विविध बंदोबस्तासाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची तब्बल 15 वर्षांपासून भोजनाची व्यवस्था आश्रमाकडून केली जाते.

 

कोरोना काळात दोन टप्प्यांत लसीकरण शिबिरांचे आश्रमात आयोजन केले आहे.ऑगस्ट 2023 ला आलेल्या पैनगंगा नदीच्या

 

महापूराने प्रभावीत झालेल्या गावांतील जनतेला अन्नधान्य व आवश्यक वस्तूंच्या किटचे वाटप आनंद दत्त धाम आश्रमाकडून केले आहे.

 

शहीद जवान यांना मानवंदना देण्यासाठी भारत-पाक सिमेवर वाघा बाॅर्डर येथे सात दिवस दत्तनाम सप्ताहाच्या आयोजनातून राष्ट्रप्रेम,वृक्षारोपण,महीला सबलीकरण,स्वच्छता,बंधुता,मानवता

 

व शांतीचा, भक्तीचा संदेश दिला.करिता संरक्षक दलाकडून द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

 

दिनांक 9 एप्रिल 2024 ते 15 एप्रिल 2024 किल्ले माहुरगड ते किल्ले रायगड पदयात्रा चे आयोजन आश्रमाकडून करण्यात आले.

 

माननीय जिल्हाधिकारी नांदेड अभिजीत राऊत यांच्या हस्ते सर्व कार्याची दखल घेऊन विशेष बाब म्हणून प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

 

याच कार्याचा सन्मान म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक नांदेड डाॅ.एन.आय.भोसिकर यांनी सद्गुरु द.भ.प.साईनाथ महाराज वसमतकर यांना गौरव करुन यथोचित सत्कार केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *