लोकसभेचा निकाल आमदार नवघरेंसाठी धोक्याची घंटा
The result of the Lok Sabha is a warning bell for MLA Navghar

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आष्टीकर यांचा विजय वसमतचे आमदार राजू नवघरे यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरणार आहे. ऑकटोबरमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत आता नवघरे यांना विजय मिळविणे शक्य दिसत नाही.
लोकसभा निवडणुकीत आलेले महाविकास आघाडीचे वादळामुळे मोठमोठे दिग्गजांना घरी बसावे लागले शिवसेना,राष्ट्रवादीची पडझड मतदारांना पटलेली नाही,
शरद पवारांना सोडून अजित पवारांचा हात धरणारे आमदार आता लोकसभेच्या निकालानंतर चिंताग्रस्त आहेत,त्यांची रात्रीची झोप उडाली आहे.
राजू नवघरेही शरद पवारांना सोडून अजित पवारांच्या सोबत भाजप-शिवसेना यांच्यासोबत महायुतीत सत्तेत सहभागी झाले ,सीतेच्या सहभागाची गोड फळेही त्यांनी चाखली ,
परंतु आता त्यांना आपल्या आमदारकीची चिंता निश्चितच लागलेली असणार .राष्ट्रवादी पक्षाचे पुढचे भविष्य हे अजित पवारच राहणार हे जवळपास सर्वच राजकीय चाणक्य सांगत होते
मात्र शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत असा काही करिष्मा करून दाखवला कि सर्वच एकाएक जमिनीवर आपटले . अजित पवारासोबत गेलेल्या आमदारांना आता ऑकटोबरची विधानसभा निवडणूक येण्यापूर्वीच पराभवाची स्वप्न पडत आहेत .
त्यासाठी आता ते पुन्हा शरद पवारांकडची वाट धरू पाहत आहेत,निकालानंतर येणाऱ्या बातम्या हेच दर्शवित आहेत.
वसमत विधानसभेत राजू नवघरे यांना जनतेने मोठ्या अपेक्षेने विजयी करून पाठविले होते. तरुण,तडफदार , युवा नेता तालुक्याचा विकास करेल हि सर्वसामान्य जनता,मतदारांची अपेक्षा होती परंतु नवघरे, हे जनतेच्या विश्वासाला पात्र ठरले नाहीत.
मुस्लिम समाजाने त्यांना भरभरून मते दिली ,समाजाची माणसे काही करत नाहीत निदान आपण नवघरेना एकगठ्ठा मतदान केले तर ते काही तरी करतील हि समाजाची अपेक्षा होती मात्र लग्नामध्ये हजेरी लावून फेसबुक वर फोटो टाकण्यासापुरतेच त्यांचे पाच वर्षाचे कार्य म्हणता येईल .
मुस्लिम समाजासाठी कोणतेही मोठे काम ते करू न शकल्यामुळे त्यांच्या बाबत मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.
दांडेगावकरांसारख्या दिग्गजाला डावलून शरद पवारांनी नवघरेवर विश्वास टाकला. मतदारांनी विजयी केले पण ते मतदारांच्या विश्वासास पात्र ठरले नाहीत हे सर्वसामान्य मतदार तर सोडाच कार्यकर्तेही खाजगीत बोलतांना दिसतात.कार्यकर्त्यांनाही आमदार नवघरेकडून खूप काही अपेक्षा होत्या परंतु त्यांच्या अपेक्षा स्वप्नच राहिल्या
राष्ट्रवादी एकसंघ असतानाच त्यांच्यावर नाराजी होतीच त्यात राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवारांच्या गोटात जाऊन नवघरेंनी मतदारांच्या नाराजीला खतपाणी घातले आहे,
आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जी पळापळ होईल त्यावेळी नवघरे पुन्हा शरद पवारांच्या गोटात येतील अशीही चर्चा आहे,परंतु राजकीय गणित पाहता शरद पवारांच्या गटात येऊन नवघरेना तुतारी मिळणे दुरापास्त आहे
कारण शरद पवारांचे निकटवर्तीय जयप्रकाश दांडेगावकर यांनाच उमेदवारी मिळणार हि काळ्या दगडावरची रेघ आहे,
जर नवघरे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले तरीही मतदारांच्या नाराजीमुळे त्यांना विजयाचा रथ हाकणे निश्चितच अवघड जाणार हे सध्याच्या परिस्थितीवरून दिसत आहे.
पण जर त्यांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश करून उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले तरीही ते मतदारांच्या नाराजीमुळे विशेषतः मुस्लिम समाजाच्या नाराजीमुळे विजयी होणे अवघड असल्याचे दिसत आहे.