लोकसभेच्या या ९ जागांसाठी अजित पवारानी धरला आग्रह ;उमेदवारही ठरले ? ,पाहा यादी
Ajit Pawar insisted for these 9 seats of the Lok Sabha; was the candidate selected? , see list

राज्यातील सर्वच राजकीय पक्षांना आगामी लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. त्यादृष्टीने सर्वांनीच कंबर कसली असून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून जागा वाटपाच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही असल्याची महत्वाची बातमी समोर आली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आगामी लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
महायुतीमध्ये अजित पवार गट लोकसभेच्या ९ जागांसाठी आग्रही आहे. अजित पवार गटातील संभाव्य उमेदवारांना मतदारसंघात चाचपणी करण्याची वरिष्ठांनी सुचना केल्याचेही सांगण्यात येत आहे.
सध्या राष्ट्रवादीकडे असलेल्या चार जागांसह आणखी पाच जागांची मागणी अजित पवार गटाने केली आहे. बारामती, सातारा, रायगड,
शिरूर या लोकसभा मतदार संघांव्यतिरिक्त धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगरच्या जागेसाठी अजित पवार गट आग्रही आहे.
संभाव्य उमेदवारांची नावे
१) बारामती – सुनेत्रा पवार
२) सातारा – रामराजे नाईक निंबाळकर
३) रायगड – सुनिल तटकरे
४) शिरूर – सध्या शिंदे गटात असणारे या मतदार संघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील
५) दक्षिण मुंबई – काँग्रेसमधील बडा चेहरा
६) परभणी- राजेश विटेकर
७) भंडारा गोंदिया – प्रफुल्ल पटेल
८) धाराशिव – राणा जगजितसिंह (सध्याचे भाजप आमदार)
९) छत्रपती संभाजीनगर – सतीश चव्हाण