लोकसभेसाठी लवकरच भाजपची दुसरी यादी;बहुसंख्य खासदारांना मिळणार नारळ ? धाकधुक वाढली
BJP's second list for Lok Sabha soon; will majority of MPs get coconuts? Fear increased

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने रविवारी पहिली यादी जाहीर केली. त्याचवेळी पक्षाकडून लवकरच उमेदवारांची दुसरी यादी जाहीर होणार असल्याच्या बातम्या येत आहेत.
भाजप संसदीय मंडळाचे सदस्य आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
भाजप संसदीय मंडळाचे सदस्य आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी सांगितले की, ते बुधवारी दिल्लीला जाणार आहेत.
बहुधा या दिवशी कर्नाटकसह अनेक राज्यांची दुसरी यादी (लोकसभा उमेदवारांची) अंतिम केली जाईल. ते लक्षात घेऊन मी दिल्लीला जात आहे.
मला विश्वास आहे की उद्या परवा यादी अंतिम होईल. यासोबतच उमेदवारांच्या यादीबाबतचा अंतिम निर्णय राष्ट्रीय नेतृत्व घेईल, असेही ते म्हणाले.
पत्रकार परिषदेत त्यांना विचारण्यात आले की, उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत कर्नाटकातील सर्व 28 मतदारसंघातील उमेदवारांची नावे असतील का? येडियुरप्पा म्हणाले की, शक्यतो उशीर होणार नाही.
सर्व जागा जाहीर होऊ शकतात. याआधी 2 मार्च रोजी भाजपने 16 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.
तज्ज्ञांच्या मते, यावेळी पक्ष कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यमान खासदारांची तिकिटे रद्द करू शकतो. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की,
पक्ष यावेळी अनेक नवीन चेहरे मैदानात उतरवत आहे. मात्र, पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या मनात काय आहे, याची त्यांना कल्पना नाही?
पक्षाच्या दिग्गज नेत्याने राज्यात एनडीए सहयोगी जेडी(एस) ला किती जागा दिल्या जातील हे देखील उघड केले नाही, परंतु माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संघटनेशी करार केला जाईल असे सांगितले.
दरम्यान देशात आता लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोग 14-15 मार्चला लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2019 लोकसभा निवडणुकीप्रमाणेच 2024 ची निवडणुकही 7 टप्प्यात होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात पहिल्या टप्प्याचं मतदान होऊ शकतं.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच पत्रकार परिषद घेईल. पुढच्या आठवड्याच्या बुधवारी किंवा गुरुवारी ही पत्रकार परिषद पार पडेल.
निवडणूक आयोग सध्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अनेक राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. सर्व राज्यांतील तयारीचा आढावा घेतल्यानंतरच आयोग निवडणुकीच्या तारखा जाहीर होतील.
निवडणूक आयोगाचं पथक सध्या पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर हे पथक उत्तर प्रदेश आणि जम्मू-काश्मिरचा दौरा करेल. 13 मार्चपर्यंत हे पथक आपला दौरा पूर्ण करतील. निवडणूक आयुक्त सर्व राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बैठका करत आहेत.
आगामी लोकसभा निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगआर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. यासाठी निवडणूक आयोग एक विभागही स्थापन करत असून हा विभाग सोशल मीडिया डिजिटल प्लॅटफॉर्मवर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राजकीय पक्ष तयारीाला लागले आहेत. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्यापूर्वी अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. सत्तारुढ भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. आम आमदी पार्टी, समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोकदलानेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये जळगाव आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनीसांगली आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाची बैठक बोलावली आहे. हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ शिवसेना लढवण्याच्या तयारीत आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटासोबत राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा ही जागा लढवण्यासाठी आग्रही होते. मात्र आता जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेना ठाकरे लढवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. हर्षल माने इथून शिवसेना ठाकरे गटाचे संभाव्य लोकसभा उमेदवार असतील
तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गट काँग्रेस पक्षाला सोडणार असून त्याऐवजी शिवसेना ठाकरे गट सांगली लोकसभा मतदारसंघाची जागा लढवण्यावर महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये एकमत होत आहे
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर श्रीमंत शाहू छत्रपती हे महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार आहेत. शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवू शकतात
तर सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करून माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील हे लढण्याची शक्यता. तसंच पैलवान चंद्रहार पाटीलही इथून इच्छूक आहेत.